शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जोडणी न देताच हातावर टेकविले वीजबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:49 IST

कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील गौरी येथील शेतकऱ्याने कोटेशन भरुनही शेतात अद्याप वीज जोडणी झालीच नाही़ उलट १० हजार ९०० रुपयांचे महावितरणने वीजबिल आकारल्याने वीज वितरणच्या आले मना तेथे कोणाचे चालेना असेच काहीसे म्हणावे लागेल़ वीजजोडणी न झाल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहे़

ठळक मुद्देगौरी येथील प्रकार : महावितरण कंपनीचा अजब कारभार

गोकुळ भवरे।लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील गौरी येथील शेतकऱ्याने कोटेशन भरुनही शेतात अद्याप वीज जोडणी झालीच नाही़ उलट १० हजार ९०० रुपयांचे महावितरणने वीजबिल आकारल्याने वीज वितरणच्या आले मना तेथे कोणाचे चालेना असेच काहीसे म्हणावे लागेल़ वीजजोडणी न झाल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहे़किनवट तालुक्यातील गौरी येथील गौतम उमरे या शेतकºयाने कृषीपंपाच्या वीजजोडणीसाठी रीतसर अर्ज करुन ३१ डिसेंबर २०१४ रोजी ५ हजार २०० रुपये कोटेशन भरले़ मात्र कोटेशन भरुनही शेतात अद्याप विद्युत खांब उभे केलेले नाहीत़ वीज जोडणी तर दूरच, असे असताना मात्र महावितरणने चक्क १० हजार ९०० रुपयाचे बिल उखळल्याने शेतकरी गोंधळला असून खांबही नाही अन् जोडणीही नाही मग वीजबिल आकारले कसे? महवितरणच्या अनागोंदी कारभाराने ग्राहकांतून मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे़२०१४ मध्ये कोटेशन भरलेल्या ग्राहक शेतकºयाला ग्राहक क्रमांक ५६५६७०००११२९ असा असून सप्टेंबर २०१७ ला १० हजार ९०० रुपये बिल आकारुन देय २९ नोव्हेंबर २०१७ रोजी बिल भरण्याच्या अंतिम तारखेनुसार बिल भरल्यास १० हजार ९१० रुपये भरावे लागतील असे बिलात नमूद केले आहे़तीन वर्षांपासून कृषीपंपाच्या वीजजोडणीसाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतात वीजजोडणी न झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून खरीप हंगामात पिकाला पाणी देऊ पाहणाºया व रबी व उन्हाळी हंगाम घेऊ इच्छिणाºया शेतकºयांच्या आशेवर पाणी फिरले असतानाच त्यात भर म्हणून वीजपुरवठा नसतानाही महातिवरणने चक्क कृषीपंपाचे वीजबिल आकारुन शेतकºयाला गोंधळात टाकले आहे़ महावितरणच्या या उलट्या कारभारामुळे कामकाजाची घडी विस्कळीत झाल्याचा आरोप शेतकरी गौतम उमरे यांनी केला आहे़अधिकारी म्हणतात...याबाबत किनवट वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता आऱआऱ परचाके यांना विचारले असता हे प्रकरण जुने असून केबल डिक्लेअरचा इश्यू आहे़ वीज वितरणने तसा प्रस्तावही सादर केला आहे़ २ कोटी ६२ लक्ष रुपयांची मागणी केलेली आहे़ यंदा डिसेंबर अखेरपर्यंत प्रलंबित वीजजोडणीचे काम मार्गी लागेल असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़