शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अधार्पूर राडा प्रकरणात ८ जणांना आठ दिवस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 17:25 IST

Adharpur Roits : ३० जून रोजी अर्धापूर शहरातील नांदेड रस्त्यावर असलेल्या एका व्यायाम शाळेत दोन युवकांमध्ये बेबनाव झाला.

नांदेड- ३० जून रोजी अर्धापूर शहरातील जीममध्ये झालेल्या भांडनाचे रुपांतर नंतर दोन गटात हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही गटातून तुफान दगडफेक करण्यात आली.  त्यातून अर्धापूर शहरात दंगल माजली. या दंगलीत पोलीसांच्या एका चार चाकी वाहनासह पाच  वाहनांचे नुकसान झाले. अनेक दुचाक्यांचे नुकसान झाले. याप्रकरणात अर्धापूर पोलीसांनी अटक केलेल्या ८ गुन्हेगारांना अर्धापूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मंगेश बिरहारी यांनी १० जुलै पर्यंत अर्थात आठ दिवस पोलीस कोठडीत सुनावली आहे. ( Eight arrested in Adharpur Roits case )

३० जून रोजी अर्धापूर शहरातील नांदेड रस्त्यावर असलेल्या एका व्यायाम शाळेत दोन युवकांमध्ये बेबनाव झाला. त्या व्यायाम शाळेत एका गटाचे युवक जास्त होते. दुसरा मात्र एकटाच होता. तेंव्हा जास्त गटाच्या लोकांनी त्या एकट्यास मारहाण केली. त्यानंतर तो युवक घरी गेला.आणि आपल्या कांही मित्रांना घेवून परत व्यायाम शाळेकडे येत असतांना त्याला मारहाण करणारी मंडळी अर्धापूर शहरातील मारोती मंदिराजवळ भेटली. त्यानंतर भांडणाला सुरुवात झाली. पोलीसांच्या आवाहनाला कोणताही प्रतिसाद न देत दोन्ही गटांनी दगडफेक सुरूच ठेवली. सायंकाळ झाल्यानंतर विद्युत दिव्ये बंद करून गोंधळ सुरूच ठेवला. या ठिकाणी पोलीसांना एक गोळी झाडावी लागली. एक रबर गोळी झाडण्यात आली आणि एकदा अश्रुधुराची नळकांडी फोडावी लागली. त्यानंतर दंगल शमली.

या गुन्ह्याचा तपास अर्धापूरचे पोलीस निरिक्षक अशोक जाधव यांच्याकडे आहे. दंगल घडल्यानंतर पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी अर्धापूर येथे भेट  दिली. पोलीसांनी या प्रकरणी जॉनी हुसेन कुरेशी (३३),मुद्दसर खान सिकंदरखान (३०) रा.बडीदर्गाजवळ अर्धापूर, राम बालाजी गिरी (१९), साईनाथ निरंजन काकडे (२०) रा.कृष्णानगर अर्धापूर, हनुमान हरी बारसे (१९) अशोक भाऊराव कानोडे (३४) रा.अहिल्यादेवीनगर अर्धापूर, शंकर धर्माजी करंडे (२७)रा. अमृतनगर अर्धापूर, शिवप्रकाश उत्तमराव दाळपुसे (२९) रा.अंबाजीनगर अर्धापूर या सर्वांना पकडले. आज २ जुलै रोजी अशोक जाधव आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी अर्धापूरमध्ये राडा करणाऱ्या या ८ जणांना न्यायालयात हजर करून या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस कोठडी कशी आवश्यक आहे याबाबत सविस्तर मांडणी न्यायालयासमक्ष केली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश मंगेश बिरहारी यांनी या पकडलेल्या आठ दंगलखोरांना ८ दिवस म्हणजे १० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड