शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन पेरू लागवडीतून आर्थिक विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 18:55 IST

Modern Farming पेरूच्या पिकाचा बहर आला असून एका वर्षात दोन सिझन घेतले जातात

ठळक मुद्दे पेरूची लागवड करून एक वर्षातच त्यापासून उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे. 

मरखेल : कमी खर्च, कमी मशागत करून चांगले उत्पन्न मिळविण्याचा प्रयोग क्वचितच शेतकऱ्यांकडून केला जातो. असाच प्रयोग देगलूर  तालुक्यातील लोणी येथील प्रगतिशील शेतकरी शिवाजी शिंदे यांनी केला आहे. कमी पाण्यावर व कोणत्याही जमिनीत येणारे, हमखास उत्पन्न देणारे व लागवड खर्च कमी असलेले पेरूची लागवड करून एक वर्षातच त्यापासून उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे. 

पेरूच्या पिकाचा बहर आला असून एका वर्षात दोन सिझन घेतले जातात पहिल्या सिझनमध्ये १७.५ कि्वंटल पेरूचे उत्पन्न निघाले असून अजून ३० ते ३५ क्विं. उत्पन्न अपेक्षित आहे. पेरूविक्रीसाठी नांदेड, निझामाबाद, व हैद्राबाद ही जवळील बाजारपेठ असून या ठिकाणी पेरूला प्रतिकिलो ५० ते ७० रु. दर मिळत आहे. पहिल्या वर्षी प्रत्येक झाडाला १० ते १५ किलो फळधारणा होते दुसऱ्या वर्षी त्यात वाढ होऊन प्रति झाडामागे ३० ते ३५ किलो फळधारणा होते. फळबाग योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी पांडुरंग फुंडकर व नानाजी देशमुख कृषी फळबाग योजनेतून हेक्टरी २ लाख रुपये अनुदान मिळते त्यासाठी शेतीत बोअर असणे व ठिबक सिंचन असणे आवश्यक  आहे. दरम्यान, चार एकरात २४०० पेरूच्या झाडाची लागवड करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात लावण्यात आलेल्या १००० झाडांना एक वर्षात फळधारणा झाली असून दोन्ही सिझनमध्ये सरासरी १० टन उत्पन्न निघण्याची शक्यता असून प्रतिकिलो ६० रुपयांचा भाव मिळाला तर एका वर्षात ६ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. 

अभ्यास करून पेरूची लागवड केली पारंपरिक शेतीतून दरवर्षी तोटा सहन करावा लागत होता. पाण्याची सोय असल्यामुळे सुरुवातीला टोमॅटो, वांगी यांचे पीक घेतले मेहनत जास्त व फायदा कमी होत होता. पेरू लागवड कमी खर्चात सर्व प्रकारच्या जमिनीवर कमी पाण्यावर करता येते हे समजल्यानंतर पेरू उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांना भेटून अभ्यास करून पेरूची लागवड केली आहे - शिवाजी शिंदे (प्रगितशील शेतकरी), लोणी ता.देगलूर 

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेडagricultureशेती