शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवून १५ लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 19:29 IST

पोलिसांनी या रस्त्यावरील अनेक दुकानांतील सीसी टीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नांदेड : बंदुकीचा धाक दाखवून एका व्यापाऱ्याकडून १४ लाख ८० हजार रुपये असलेले बॅग लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हिंगोली गेट ओव्हरब्रीजवर घडली. भरदिवसा घडलेल्या लुटीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शहरातील नवा मोंढा येथील योगेश मार्केटिंगचे मालक ओम बोरलेपवार हे बॅगेत १४ लाख ८० हजार रुपये घेऊन बँकेत भरण्यासाठी चिखलवाडी कॉर्नर येथे जात होते. त्यांची दुचाकी हिंगोली गेट उड्डाणपुलावर आली असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांची दुचाकी अडविली. यावेळी त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून घेतली. बोरलेपवार यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना गोळी घालण्याची धमकी देण्यात आली. घटनेनंतर चोरट्यांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, पोनि.जगदीश भंडरवार, द्वारकादास चिखलीकर, सपोनि पांडुरंग भारती यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या रस्त्यावरील अनेक दुकानांतील सीसी टीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. याप्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चौकातील कॅमेरे बंदचसेफ सिटी योजनेअंतर्गत नांदेड शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु देखभाल आणि दुरुस्ती नसल्यामुळे यातील अनेक कॅमेरे बंदच आहेत. त्यामुळे चाेरट्यांचे फावत आहेत. भरदिवसा घडलेल्या या लुटीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये मात्र दहशत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरी