शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

विजेच्या मागणीत दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:18 IST

खासगी बाजारपेठेत हरभरा वाढला हिमायतनगर : केंद्र शासनाकडून हरभऱ्याला ५१०० रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला. दुसरीकडे खासगी बाजारपेठेत आठ ...

खासगी बाजारपेठेत हरभरा वाढला

हिमायतनगर : केंद्र शासनाकडून हरभऱ्याला ५१०० रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला. दुसरीकडे खासगी बाजारपेठेत आठ दिवसांपासून ५२०० चा भाव आहे. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून खासगी व्यापाऱ्यांकडे हरभरा विक्री करण्याकडे जात आहेत. केंद्राने हरभऱ्याचे भाव वाढविल्यास पुन्हा शेतकरी वळतील.

बियाणे, खतांची आवक वाढली

धर्माबाद :येथील व्यापाऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली, या हंगामात खते, बियाणांची वाढती मागणी लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी आतापासूनच साठा करण्यास सुरुवात केली. खत आणि बियाणांची आवक सुरू झाली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून खरीप हंगामासाठी खरेदीला प्रारंभ होईल, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे.

रेल्वेगाड्या नसल्याने प्रवाशांची गैरसोय

मुदखेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने मागील आठवड्यात ११ रेल्वे गाड्या प्रवासी संख्येअभावी बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. परजिल्ह्यात प्रवास करण्यासाठी नागरिकांना रेल्वेची सुविधा होती. ती देखील प्रशासनाने बंद केल्याने बाहेर जिल्ह्यात प्रवासासाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

ग्रामीण भागात पाणीटंचाई

बिलोली : तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांच्या जलस्रोतांचे पाणी आटल्याचे ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नळ योजनेला पाणी येत नाही. शेत-शिवारातून पाणी आणावे लागते. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

भाजीपाल्याचे नुकसान

माहूर : बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत आहे. मोठ्या प्रमाणात भाजीपाला शिल्लक राहत असल्याने विक्रेत्यांसह उत्पादकांनाही आर्थिक फटका बसत आहे. विक्रीला परवानगी देण्याची गरज आहे.

साहित्य गायब

अर्धापूर : शहरातील विविध विभागांमध्ये उभारलेल्या हातपंपांचे साहित्य गायब झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक हातपंप बंद असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. नगरपंचायतीने हे पंप सुरू करावेत, अशी मागणी आहे.

कलावंतांची कोंडी

नांदेड : सध्या संचारबंदी लागू करण्यात आल्याने कलावंतांना जनजागृतीसाठी कामे मिळत नसून कलावंतांची आर्थिक कोंडी होत आहे. कलावंतांसाठी शासनाने अनुदानाची तरतूद करावी, अशी मागणी होत आहे.

वाळू घाटांच्या लिलावांना प्रतिसाद मिळेना

नांदेड : जिल्ह्यातील वाळूघाटांच्या लिलावांना प्रतिसाद मिळत नसल्याने हे लिलाव बंद करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने जवळपास १२ ते १५ वाळू घाटांचे लिलाव ठेवले होते. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने लिलाव रखडले आहेत. त्यामुळे या वाळूघाटातून अवैध वाळू उपसा होण्याची शक्यता आहे.

पूर्व वैमनस्यातून मारहाण

बिलोली : तालुक्यातील सगरोळी येथे पूर्व वैमनस्यातून मारहाणीची घटना घडली. सगरोळी येथील सायगौडा बसवगौडा यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपीने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या मनगटावर मार लागल्याने फॅक्चर झाले. आरोपीने त्यांना जीवे मारण्याचीही धमकी दिली.

नायगावात व्यापाऱ्यांना दंड

नायगाव : लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चिद्रावार फॅमिली शॉप व चिद्रावार वस्त्रालय यांना तहसीलदार गजानन शिंदे व नगरपंचायतीच्या पथकाने ४० हजारांचा दंड आकारला. दंडात्मक कारवाईनंतरही शनिवारी छुप्या पद्धतीने व्यवहार सुरू होते. या कारवाईत तहसीलदार गजानन शिंदे, मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर, कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव, शेख युनुस, रामेशल्वर बापुले, श्रीधर कोलमवार, संभाजी भालेराव, गणेश चव्हाण आदी सहभागी होते.

पेरणीपूर्व शेती कामात व्यस्त

फुलवळ : फुलवळ परिसरातील शेतकरी खरीप हंगामासाठी शेतीच्या तयारीसाठी कामाला लागले आहेत. कोरोनामुळे अनेक शेतकरी कुटुंबियांनी आपले घर शेतातच हलविल्यामुळे सकाळी लवकरच शेतातील कामे उरकण्यासाठी वेळ मिळत आहे. शेणखत टाकणे, नांगरणी करणे याचबरोबर हळद वाळवणे यासारखी कामे कुटुंबातील सदस्य करीत आहेत. वेळ व पैसाही वाचत असल्याने कोरोनापासून वाचण्यासाठी ही कामे उपयोगी ठरत आहेत.

धर्माबादेत भाजपच्यावतीने निषेध

धर्माबाद : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटनेचा धर्माबाद भाजपच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पोतगंतीवार, साईनाथ शिरपुरे, नगरसेवक संजय पवार, रामेश्वर गंदेलवार, सतीश मोटकुल, अंकीत गोधा, अमित मुंदडा, निलेश मंगनाळीकर, माधव पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हा बँकेच्या शाखेची मागणी

किनवट : तालुक्यातील शिवणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. इस्लापूर येथे एकमेव शाखा सुरू असल्याने शिवणी, इस्लापूर, जलधरा येथील लोकांची मोठी गर्दी होते. पूर्वी शिवणी, इस्लापूर, जलधरा येथे बँकेच्या शाखा होत्या. मात्र त्या डबघाईस आल्याने बंद करून इस्लापूर येथे एकत्रित करण्यात आले होते.

रेशन कीटचे वाटप

नांदेड : पराग सामाजिक बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने दिव्यांग व कोरोनाने मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना रेशन कीटचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत गवळे, सचिव जयश्री गवळे, प्राचार्य कान्हा शिरसाठ, नवनाथ भद्रे, रणजीत गवळे, डॉ. पराग गवळे, पायल गवळे आदी यावेळी उपस्थित होते.