जिल्ह्यात कोविशिल्डचे आतापर्यंत ४ लाख २ हजार ६३०, तर कोव्हॅक्सिनचे १ लाख १९ हजार ९४० असे एकूण ५ लाख २२ हजार ५७० लस प्राप्त झाल्या आहेत. या लसीच्या मात्रातून आतापर्यंत जिल्ह्यात ४ लाख २७ हजार ५९२ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मनपाअंतर्गत श्री गुरू गोविंदिसंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, हैदरबाग रुग्णालय, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, सिडको या मनपा रुग्णालयात कोविशिल्डचे, तर श्री गुरू गोविंदिसंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, हैदरबाग रुग्णालय, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, सिडको, जंगमवाडी, श्रावस्तीनगर, सिडको येथे कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील १६ उपजिल्हा रुग्णालयांतही दोन्ही डोस उपलब्ध करून दिले आहेत. ग्रामीण भागातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रावर मात्र कोविशिल्डचे डोस उपलब्ध राहणार आहेत. प्रत्येक केंद्रावर १०० डोसचा पुरवठा केला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी सांगितली. नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनाच लस दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.