बिलोली -धर्माबाद परिसरात या जागेवरील अनुभव मंटपामुळे बसवतत्त्व प्रचारास गती मिळणार आहे. बहुजन समाजातील सर्व घटकापर्यंत समतीचे बसव विचार पोहोचविण्याचे विविध उपक्रम या अनुभव मंटपात करण्यात येणार आहे. येथे विद्यार्थी प्रशिक्षण केंद्र व लिंगायत तसेच जंगम प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात येणार आहे. समतावादी साहित्यासोबत समग्र शरण साहित्यही येथे उपलब्ध राहील. माजी आ. पटने यांनी जमीन हस्तांतरणाची ही प्रक्रिया समितीचे सचिव ॲड. शिवानंद हैबतपुरे यांच्या उपस्थितीत पार पाडली. पटने यांनी ज्या अपेक्षेने व भावनेने जागा दान केली आहे त्या अपेक्षा बसव अनुभव मंटप समिती पूर्ण करेल, असा विश्वास समितीचे सचिव हैबतपुरे यांनी यावेळी दिला. पटने यांनी महात्मा बसवण्णांचे विचार समतावादी समाजनिर्मितीला बळ देणार आहेत. ते विचार बहुजन समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. लिंगायत धर्म मान्यता आंदोलनातील कार्यकर्त्यांनी आगामी जनगणनेत आपल्या धर्माची नोंद ही लिंगायत म्हणूनच करण्यासाठी लोकजागृती करण्याचे आवाहन पटने यांनी केले. यावेळी हनमंतप्पा औरादे, चंद्रशेखर पाटील, नीळकंठ पाटील, बसवेश्वर गुडपे आदींची उपस्थिती होती.
बसव अनुभव मंटपासाठी १ एकर जागा दिली दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST