शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

परजिल्ह्यातील डॉक्टर्सना देगलूर तालुक्यात नियुक्ती, स्थानिक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:13 IST

कम्युनिटी हेल्थ आॅफिसर या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत स्थानिक अथवा जिल्ह्यातील डॉक्टराना डावलून इतर जिल्ह्यांतील डॉक्टरांना संधी दिल्यामुळे यासंबंधी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे डॉक्टर मंडळींनी लेखी तक्रार केली आहे.

देगलूर : कम्युनिटी हेल्थ आॅफिसर या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत स्थानिक अथवा जिल्ह्यातील डॉक्टराना डावलून इतर जिल्ह्यांतील डॉक्टरांना संधी दिल्यामुळे यासंबंधी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे डॉक्टर मंडळींनी लेखी तक्रार केली आहे.आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथे कम्युनिटी हेल्थ आॅफिसर या पदासाठी शासनाने जाहिरात काढली होती. या जाहिरातीत नांदेड जिल्ह्यातील देगलूर, लोहा, माहूर, किनवट व अन्य सहा तालुक्यांचा समावेश होता. सदरील भरतीतील निवडप्रक्रियेमध्ये स्थानिक तालुक्यातील उमेदवारास तालुक्याचे १० व जिल्ह्याचे १० असे एकूण २० गुण अतिरिक्त व स्थानिक उमेदवारास प्राधान्य होते. यातून स्थानिक वैद्यकीय पदवीधरांना रोजगाराची संधी मिळावी याद्वारे स्थानिक जनतेस चांगल्याप्रकारे मूलभूत आरोग्य सेवा प्राप्त व्हावी हा शासनाचा उद्देश होता. स्थानिक डॉक्टर्सना प्रथम नियुक्ती देणे या नियमास बगल देऊन लातूरच्या आरोग्य उपसंचालकांनी बाहेरील हिंगोली जिल्ह्यातील उमेदवाराना नियमबाह्य रितीने देगलूर व लोहा तालुक्यात नियुक्ती देऊन अजब कारभाराचे गजब दर्शन घडवले आहे. यामुळे देगलूर, लोहा परिसरातील नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक बेरोजगार डॉक्टरांच्या स्वप्न हवेतच विरले आहेत. याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर ते आरोग्य उपसंचालकाकडे बोट दाखवून मोकळे होत आहेत. याबत योग्य न्याय मिळावा, या भूमिकेतून देगलूरच्या डॉक्टरांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, आयुक्त, आरोग्य सेवा अभियान मुंबई यांच्याकडे निवेदन पाठवले आहे.निवेदनावर डॉ. योगेश दाचावार, डॉ. श्रीराम बिरादार, डॉ.बालाजी बिरादार, डॉ. सुनील जाधव, डॉ. रघुनाथ क्षेत्री, डॉ.अमित शहापुरकर, डॉ. निलराज पाटील, डॉ.बालाजी गुजे, डॉ.केदार उप्पलवार, डॉ.मल्लिकार्जुन पाटील, नम्रता खानापुरे यांच्यासह सर्व डॉक्टरांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Nandedनांदेडdocterडॉक्टरMedicalवैद्यकीयTransferबदली