शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘डिग्री’हवी आहे ना? वृक्ष लावून संवर्धन करा! विद्यापीठाकडून परिपत्रक जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 07:19 IST

स्वारातीम विद्यापीठाकडून परिपत्रक जारी

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या   राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड आणि संवर्धन अनिवार्य केले आहे. प्रति विद्यार्थी पाच वृक्ष लागवड करून संवर्धन केल्याशिवाय पदवी प्रमाणपत्र दिले जाणार नाही.  

सर्वच विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण हा विषय अनिवार्य आहे. या विषयांतर्गत केवळ थिअरी शिकविली जाते. अंतर्गत आणि विद्यापीठ परीक्षेतील गुण यावर ग्रेड दिला जातो; मात्र खऱ्या अर्थाने वृक्ष लागवड व झाडांचे संवर्धन व्हावे, यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. या विषयांतर्गत विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड आणि संवर्धन केल्याशिवाय पदवी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, यासाठी  लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा यांनी पाठपुरावा केला होता. यासंदर्भात त्यांनी  राज्यपाल व  विद्यापीठाच्या कुलगुरूंनाही निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत विद्यापीठाने तत्काळ परिपत्रक जारी करून पर्यावरण विषयांतर्गत वृक्ष लागवड आणि संवर्धन विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य केले आहे. या निर्णयामुळे विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होऊन संवर्धन होण्यास मदत होईल.

टॅग्स :Nandedनांदेड