शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

दबावाला बळी पडू नका, दबाव आणणार्‍यांची नावे जाहीर करा; नांदेड मनपा आयुक्तांचे कर्मचार्‍यांना आवाहन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 19:10 IST

जिल्हा परिषद शिक्षण अधिकार्‍यांना डांबल्याचा प्रकार चर्चेत असतानाच महापालिकेतही अधिकार्‍यावर दबावसत्र सुरू असल्याची बाब पुढे आली आहे. यानंतर आयुक्त गणेश देशमुख यांनी अधिकारी, कर्मचार्‍यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये. दबाव आणणार्‍यांची नावे जाहीर करावी, असे स्पष्ट केले आहे.

नांदेड : जिल्हा परिषद शिक्षण अधिकार्‍यांना डांबल्याचा प्रकार चर्चेत असतानाच महापालिकेतही अधिकार्‍यावर दबावसत्र सुरू असल्याची बाब पुढे आली आहे. यानंतर आयुक्त गणेश देशमुख यांनी अधिकारी, कर्मचार्‍यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये. दबाव आणणार्‍यांची नावे जाहीर करावी, असे स्पष्ट केले आहे.

सेवानिवृत्तीच्या एक दिवस अगोदर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बळवंत जोशी यांना अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी ३० जानेवारी रोजी डांबल्याचा प्रकार पुढे आला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरु असताना महापालिकेतही सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी त्यांच्या सेवाविषयक बाबी तसेच वैयक्तिक कामे करुन घेण्यासाठी राजकीय कार्यकर्ते व अन्य अशासकीय व्यक्तीमार्फत प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र अशा कोणत्याही दबावाला अधिकार्‍यांनी बळी पडू नये, असे आयुक्त देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. 

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम १९७९ च्या नियम २३ च्या तरतुदीनुसार कोणताही शासकीय कर्मचारी त्यांच्या शासकीय सेवेबाबत कोणत्याही बाबीच्या संबंधात कोणत्याही वरिष्ठ प्राधिकरणावर कोणताही राजकीय किंवा बाह्य दबाव आणणार नाही किंवा तसा प्रयत्न करणार नाही, अशी तरतूद आहे. या तरतुदीचा भंग केल्यास शासकीय अधिकारी, कर्मचारी शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र ठरतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आयुक्तांनी वर्ग-३ आणि ४ च्या कर्मचार्‍यांसंबंधीचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार उपायुक्तांना प्रदान केले आहेत. याच बाबीचा लाभ घेण्याचा प्रयत्न काही अधिकारी- कर्मचार्‍यांकडून होत आहे.

यात राजकीय मंडळी त्यातही मनपातील सत्ताधारी हस्तक्षेप करीत आहेत.  कर्मचार्‍यांच्या अंतर्गत बदल्या संदर्भात अधिकार्‍यावर दबाव आणला जात आहे. काही कर्मचारीही राजकीय वरदहस्तातून आपल्याला हवी ती जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यातूनच राजकीय हस्तक्षेपालाही चालना मिळत आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता सर्व विभागाच्या नाड्या आवळण्याचे काम आयुक्तांनी केले आहे. परिणामी मनाजोगत्या जागी जाण्यासाठी कर्मचार्‍यांकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आपल्या वरिष्ठांवर दबाव आणण्यासही मागे-पुढे पाहिले जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

आयुक्तांनी तात्काळ घेतली दखलआयुक्तांनी १ फेब्रुवारी २०१८ रोजी एका परिपत्रकाद्वारे अशा दबाव आणण्याचा प्रयत्न करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांची नावे कळवण्याच्या आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचार्‍यांना सूचना दिल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे महापालिकेतही दबावतंत्राचा वापर सुरू असल्याची बाब उघड झाली आहे.