शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

लॉकडाऊनमध्ये पती-पत्नीतील वाद विकोपाला; निर्बंध हटताच पीडित महिलांनी गाठले पोलीस ठाणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 20:22 IST

लॉकडाऊनमध्ये सूट देताच पोलीस ठाण्यातील गृहकलहाच्या तक्रारींचा ओघही वाढला़ मे महिन्यात बलात्काराचे ४, विनयभंगाचे २४ आणि छळाचे फक्त ३ गुन्हे दाखल होते़

ठळक मुद्दे जिल्ह्यातील विविध ठाण्यांत १६ गुन्ह्यांची नोंद

- शिवराज बिचेवार

नांदेड : कोरोनाच्या महामारीमुळे अडीच महिन्यांहून अधिक काळ अनेकजण घरातच अडकून पडले होते़ व्यवसाय, नोकरीचा ताण अन् हाताला काम नसल्याच्या मनस्थितीत क्षुल्लक कारणावरुन पती-पत्नीत गृहकलह वाढला़ त्याचा परिणाम म्हणून अनलॉक होताच पोलीस ठाण्यांमध्ये छळाच्या तक्रारी सुरु झाल्या़ जून महिन्यात अशा १६ विवाहितांनी ठाण्याची पायरी चढली़ तर बलात्काराचेही सात गुन्हे दाखल झाले आहेत़ आता पुन्हा एकदा आठवडाभराचा लॉकडाऊन करण्यात आला आहे़ 

अचानक घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळे लोक घरातच बंदिस्त झाले़ सामाजिक संपर्क तुटला, व्यवहार ठप्प झाले़ बहुसंख्य लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ या सर्व बाबींमुळे लोकांच्या मानसिक, भावनिक आणि वर्तणुकीवर वाईट परिणाम होत आहे़ चिंता, निद्रानाश, चिडचिड, नैराश्य आणि भविष्याबद्दल अनिश्चतता लोकांच्या मनात घर करु पाहत आहे़ त्यामुळे आक्रमक होवून हिंसक प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत. त्याचा परिणाम कुटुंबातील वातावरणावर होत आहे़ विशेष करुन पती-पत्नीत क्षुल्लक कारणावरुन झालेले वादही त्यामुळे ठाण्यापर्यंत पोहोचत आहेत़ २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला़ त्यात एप्रिल आणि मे महिन्यात त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली़ परंतु, जून महिन्यात त्यामध्ये सूट दिली़ लॉकडाऊनमध्ये सूट देताच पोलीस ठाण्यातील गृहकलहाच्या तक्रारींचा ओघही वाढला़ मे महिन्यात बलात्काराचे ४, विनयभंगाचे २४ आणि छळाचे फक्त ३ गुन्हे दाखल होते़ 

जूनमध्ये बलात्काराचे ७, विनयभंगाचे २४ आणि छळाच्या गुन्ह्यात वाढ होवून ते १६ झाले होते़ तर जुलैमध्ये आतापर्यंत ३ छळाचे गुन्हे दाखल झाले आहेत़ आता पुन्हा एकदा आठ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे़ त्यामुळे गृहिणींच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे़ किरकोळ कारणावरुन झालेले भांडणही घटस्फोटापर्यंत पोहोचत आहे़ पोलिसांकडून अशा जोडप्यांसाठी ‘भरोसा सेल’ सुरु करण्यात आला आहे़ या ठिकाणी पती-पत्नी अन् त्यांच्या कुटुंबीयांचे योग्य समुपदेशन करुन त्यांच्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येतो़ 

एकमेकांना समजून घ्या, मार्ग निघेलयेणारा काळ जरी अनिश्चिततेने ग्रासलेला असला तरी, लोकांनी सकारात्मक मानसिकता बाळगलीच पाहिजे़ मानसिक ताण जाणवला तर आपले आप्तस्वकीय, नातेवाईक, मित्र यांच्याशी संवाद साधला पाहिजे़ पती अन् पत्नी दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहिजे़ रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी संगीत, कला यासह इतर छंद जोपासा़ ज्या कारणामुळे घरात वाद होतात़ अशा कारणांचा शोध घेवून पती-पत्नीने एकत्र बसून त्यावर तोडगा काढावा़ संतुलित आहार, शारीरिक श्रम आणि पुरेशी झोप घेतली पाहिजे़ कोणत्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये़ एकमेकांना समजून घ्यावे़ - डॉ़रामेश्वर बोले, मानसोपचारतज्ज्ञ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी