शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

डिझेल संपले अन् अपहरणाचा डाव फसला; रस्त्यात बंद पडलेल्या गाडीत मुलाला सोडून अपहरणकर्ते फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 17:40 IST

गुरुवारी खेळण्यासाठी बाहेर पडलेल्या ओमकार याला देगलूर येथील सुभाष नगरातील आरोपी महेश शेषेराव बोईनवाड याने चॉकलेट देऊन गाडी शिकवण्याचा बहाणा केला व त्याचे अपहरण करुन त्याला अज्ञातस्थळी नेले.

ठळक मुद्देआरोपी संशय येऊ नये म्हणून फिर्याद देण्यासही पोलीस ठाण्यात उपस्थितएखाद्या चित्रपटातील कथेला लाजवेल, असा नित्यक्रम आरोपीने रचला होता.

बिलोली (जि. नांदेड) : डिझेल संपल्याने गाडी रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे देगलूर येथील ओमकार अशोक पाटील या ११ वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा अपहरणकर्त्याचा डाव फसला. यावेळी अपहरणकर्ता जागेवरच वाहन व मुलाला तसेच सोडून फरार झाला. दरम्यान, अपहरण करण्याचा प्रयत्न झालेला मुलगा सहीसलामत आपल्या आई-वडिलांकडे सुखरुप पोहोचला. एखाद्या चित्रपटात शोभेल, अशी ही घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान बडूर येथे उघडकीस आली.

गुरुवारी खेळण्यासाठी बाहेर पडलेल्या ओमकार याला देगलूर येथील सुभाष नगरातील आरोपी महेश शेषेराव बोईनवाड याने चॉकलेट देऊन गाडी शिकवण्याचा बहाणा केला व त्याचे अपहरण करुन त्याला अज्ञातस्थळी नेले. याचदरम्यान ओमकारच्या अपहरणाची चर्चा संपूर्ण देगलूरमध्ये पसरली. ओमकारच्या घरासमोर जमाव जमा झाला. यावेळी आरोपी महेशही तेथे उपस्थित होता. या गोंधळानंतर ओमकारच्या आई-वडिलांनी देगलूर पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली.

बेशुद्ध करण्यासाठी डोक्यावर लोखंडी सळईने प्रहारदरम्यान, पहाटे ३ वाजता बिलोली तालुक्यातील बडूर येथे मुलाला पळवून घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक (एमएच ४७ वाय ७८३७)चे डिझेल संपल्यामुळे गाडी थांबली. त्याचवेळी वाहनात असलेल्या मुलाचे रडणे थांबवून त्याला बेशुद्ध करण्याच्या हेतूने आरोपीने लोखंडी सळईने त्याच्या डोक्यावर प्रहार केले. मुलगा बेशुद्ध झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी गावात डिझेल आणण्यासाठी गेला.

अन् वृद्ध धावला मदतीसाठीआरोपी डिझेल आणण्यासाठी गेल्यानंतर ओमकार शुद्धीवर आला व त्याने ‘वाचवा, वाचवा’ अशी हाक दिली. ही हाक ऐकून बडूर येथील वृद्ध रामराव गुजरवाड (६८) यांनी गाडीकडे धाव घेतली व त्यांनी अन्य लोकांनाही त्याठिकाणी बोलावले. या दरम्यान डिझेल घेऊन आलेल्या आरोपीने तेथे जमलेला जमाव व परिस्थिती पाहून वाहन, मोबाईल व अन्य साहित्य जाग्यावरच सोडून पलायन केले. त्यानंतर ओमकारकडून मिळालेल्या माहितीआधारे गुजरवाड यांनी त्याच्या आई-वडिलांशी संपर्क साधला व नंतर सगरोळी येथील त्याचे नातेवाईक संजय पाटील-सगरोळीकर व ग्रामस्थांनी ओमकारला बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल केले. तेथे बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश तोटावार यांनी त्याच्यावर उपचार केले. या घटनेची माहिती मिळताच देगलूरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, जमादार सुनील पत्रे, पोलीस कर्मचारी सुनील कदम, बिलोलीचे सहाय्यक फौजदार माधव वाडेकर यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे अधिक तपास करत आहेत.

संशय येऊ नये म्हणून फिर्याद देण्यासही पोलीस ठाण्यात उपस्थितआरोपी बोईनवाड हा मूळचा मुखेड तालुक्यातील कोळनूर येथील रहिवासी आहे. तो मुंबईत वास्तव्याला होता. लॉकडाऊन दरम्यान तो देगलूर येथे आला. अपहृत मुलाच्या शेजारीच तो राहात होता. मुलाचे अपहरण करून कोणालाही संशय येऊ नये म्हणून तो दिवसभर कोळनुरे कुटुंबियांसोबत होता. देगलूर पोलीस ठाण्यातही तो फिर्याद देण्यास गेला होता. एखाद्या चित्रपटातील कथेला लाजवेल, असा नित्यक्रम आरोपीने रचला होता. मात्र, गाडीतील डिझेल संपल्याने त्याचा संपूर्ण डाव फसला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडKidnappingअपहरण