शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नामफलकाचा वाद निकाली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:23 IST

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा वाद १७ मार्च रोजी झालेल्या चर्चेअंती निकाली निघण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सोनापीर बाबा दर्गाहचे मुजावर फकीर महमंद यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा वाद १७ मार्च रोजी झालेल्या चर्चेअंती निकाली निघण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सोनापीर बाबा दर्गाहचे मुजावर फकीर महमंद यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते.शिवप्रेमी नागरिकांनी नामफलक त्याच जागी लावा, अशी मागणी करुन २१ मार्च रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या मागणीच्या अनुषंगाने निरधारी जाधव, विशाल शिंदे पाटील, आशीष चारभाई, विकास कपाटे, विजय आराध्ये, सुरेश आराध्ये, विनोद सूर्यवंशी, जितू चोले, संदीप गोरडे, गणेश जाधव यांनी मौनवृत्त आंदोलन सुरु केले. तसेच विश्वनाथ पाटील, अंकुश बाळसकर यांनी २१ मार्च रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने वाद चिघळत असल्याचे पाहून सोनापीर दर्गाहचे मुजावर फकीर सादीक यांच्या नेतृत्वाखाली पं.स.चे माजी सभपाती वसंत कपाटे, सय्यद सादीक किरमाणी, नितीन तोडसाम, राजू दराडे, राम दातीर, कार्तिक बेहरे, संजय सुरोशे, संजय पेंदोर, मोरेश्वर वाठोडकर, संजय बनसोड यांनी पालिकेसमोर धरणे आंदोलन केले.यावेळी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नगरसेवक रहेमत अली यांनी चर्चेत भाग घेवून तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात चर्चा करुन प्रकरण निकाली काढण्याचे ठरले.आंदोलनस्थळी नंदकुमार संतान, निरधारी जाधव, गजानन भारती, राज ठाकूर, रुपेश दीक्षित, सुनील गुप्ता, राम कोंडे, बळीराम परसवाळे, जगदीश वडसकर, उमेश चौहाण, संजय उकंडे, अजय पेंदोर, गजानन पळसकर, शामराव बोधनकर, पांडू टेकाम उपस्थित होते. यावेळी सचिन नाईक, विनायक देशमुख व सचिन राठोड यांनीही भेट दिली. जमादार प्रभाकर कर्डेवार, बंडू जाधव आदींनी बंदोबस्त ठेवला होता.तत्कालीन ग्रामपंचायतने घेतला ठरावतत्कालीन माहूर ग्रामपंचायतने ३ नोव्हेंबर २०११ रोजी घेतलेल्या ठराव क्रमांक ८ अनुसार मुख्य बाजारातील चौकाचे छत्रपती शिवाजी चौक, असे नामकरण केल्याचा ठराव संमत केला होता. त्यानुसार शासकीय, खाजगी स्तरावर या चौकाचा उल्लेख शिवाजी चौक म्हणून सुरु झाला. मात्र दोन महिन्यांपूर्वी काही मंडळींनी या चौकात नामफलक लावण्यास विरोध केल्याने वाद चिघळला.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजagitationआंदोलन