शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धर्माबादेतील पंप हाऊस दुरुस्तीचे काम वेगाने सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:10 IST

येथील नगरपालिका अंतर्गत असलेल्या धर्माबाद शहराला एक नव्हे दोन दिवस नव्हे, तब्बल सात दिवसापासून ऐन उन्हाळ्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले.

ठळक मुद्दे‘लोकमत’ इफेक्ट पालिका प्रशासन झाले जागे सात दिवसांपासून सुरु होता दूषित पाणी पुरवठा

धर्माबाद : येथील नगरपालिका अंतर्गत असलेल्या धर्माबाद शहराला एक नव्हे दोन दिवस नव्हे, तब्बल सात दिवसापासून ऐन उन्हाळ्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले. पंप दुरूस्ती करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून नांदेड येथील मेकॅनिकला बोलावण्यात आले. नगरपालिका वेगाने कामाला लागली. पंप दुरुस्तीमुळे २५ एप्रिल रोजी म्हणजेच आठव्या दिवशी शहराचा अख्खा पाणीपुरवठाच बंद करून टाकला.इळेगाव गोदावरी पात्रातून व बाभळी बंधारातून धर्माबाद शहराला पाणीपुरवठा होतो. इळेगाव गोदावरी पाञात दोन पंप असून त्यातील एक पंप मोटर आत खोलवर पाणी खेचतो़ तर एक पंप मोटर आत खोलवरच पाणी खेचत नाही. त्यातील एक पंप मोटर सात दिवसापूर्वीच खराब झाला तरी धर्माबाद नगरपालिकेने पंप दुरुस्तीसाठी काहीही हालचाली केल्या नाहीत. परिणामी नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. यंत्रणा ककामाला लागली. पंप दुरुस्तीसाठी नांदेडहून संबंधित कुशल कामगारांना बोलाविण्यात आले असून, संबंधित कामगारांनी पंप दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.‘लोकमत’च्या वृत्ताअगोदर पालिकेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना शहरात दूषित पाणी पुरवठा होत नसल्याचे माहिती नव्हते काय? नगरसेवकही यासंदर्भात काहीही बोलले नाहीत. हा एकूणच प्रकार नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा गंभीर आरोप नागरिकांंनी केला असून, दूषित पाण्यामुळे जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला पालिकेचे संबंधित जबाबदार राहतील, असेही नागरिकांंनी सांगितले.दुसरीकडे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागात आनंदी आनंद आहे. विभागात अनुभवी आॅपरेटरची कमतरता आहे.पंप खराब झालाच तर काय करावे? काय करु नये? याचे ज्ञान सध्या असलेल्यांना नाही. एकूणच विभागात समन्वयाचा अभाव जाणवतो. दुसरीकडे पाणी पुरवठ्यावर मात्र लाखो रुपये खर्च दाखविला जातो, हा खर्च जातो कुठे? हा संशोधनाचा विषय आहे. नगरसेवकही याकडे लक्ष देण्यास तयार होत नसल्याने नागरिक नाराज झाले असून दाद मागावी कोणाकडे ? असा सवाल करीत आहेत.

पंप दुरूस्ती चालू असून बंधाऱ्यातील पाणीपातळी कमी झाली आहे. दुरूस्ती झाल्यानंतर शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल. जिल्हाधिकारी यांच्याकडे बळेगावचे पाणी सोडण्याची मागणी करणार आहोत-मंगेश देवरे, मुख्याधिकारी, धर्माबाद पालिकापाण्याची टाकी धुतली जात आहे जेथून पाणी घेतले जाते, तेथे प्रवाह नाही. पाणी डबक्यात जमा असल्याने ते खराब आहे. त्यामुळे दूषित पाणी येत असेल. इळेगाव गोदावरी येथील पंप खराब झाला आहे़ दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले.- अफजल बेगम अब्दूल सत्तार, नगराध्यक्षा, धर्माबादइळेगाव गोदावरीचे पंप हाऊस खराब होऊन सात दिवस झाले आहे. थेट रत्नाळीला होणारा पाणी पुरवठा दूषीत होत होता. जिल्हाधिकाऱ्यांकडे पाण्याची मागणी केली आहे.-विनायकराव कुलकर्णी, उपनगराध्यक्ष, धर्माबाद

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाई