शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

माहूरच्या विकासाला आचारसंहितेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:41 IST

श्री रेणुका मंदिराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रोप-वे, लिफ्ट व अद्ययावत पर्यटन यात्री निवासासह इतर विकास कामासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर केला होता. त्या कामाची निविदाही निघणार होती़

ठळक मुद्देविकासाला बसली खीळ : केंद्राचा रस्ते विकास निधी अडकला

श्रीक्षेत्र माहूर : श्री रेणुका मंदिराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रोप-वे, लिफ्ट व अद्ययावत पर्यटन यात्री निवासासह इतर विकास कामासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर केला होता. त्या कामाची निविदाही निघणार होती़ पण निविदा निघण्याआधीच लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने माहूर तीर्थक्षेत्राच्या विकासाला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे.माहूर गडाचा विकास इतर तीर्थक्षेत्राच्या तुलनेत नगण्य झाला आहे़ आघाडी सरकारने घोषित केलेल्या ७९ कोटींपैकी केवळ २७ कोटीचा निधी दिला होता़ त्यानंतर युतीच्या काळात किरकोळ निधींशिवाय काहीच मिळाले नाही़ २७ कोटीच्या निधीतून माहूर टी पॉर्इंट-रेणुकादेवी मंदिर-गरुड गंगा इथपर्यंत सिमेंट रस्ता व श्री रेणुकादेवी संस्थानवर एक्सप्रेस फिडरची उभारणी करण्यात आली़ गुरुड गंगा ते दत्त शिखर संस्थानपर्यंतचा तीन कि़मी़ रस्ता हा वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने रस्त्यासह विविध विकास कामे प्राधिकरणास करता आली नाही.सा.बां.विभाग, वन विभाग, श्रीरेणुकादेवी संस्थान, जिल्हाधिकारी कार्यालयाने संयुक्तरीत्या वन जमीन हस्तातरणासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून ४.०९ हेक्टर जमीन संपादित केली सुधारित आराखड्यानुसार फोरट्रेस कंपनीने शासनाकडे निधीची मागणी केली़ मात्र गेल्या सहा वर्षात निधी उपलब्ध न झाल्याने विकास आराखड्यामध्ये मंजूर असलेली कामे रखडली आहेत.मागील वर्षात ७९ कोटीचा विकास आराखडा २१६ कोटींवर पोहोचला़ २०१७ मध्ये सुधारित २१६ कोटीच्या आराखड्याला मुख्यमंत्रांनी मंजुरी दिली. सुरुवातीस मंजूर झालेले दोन कोटी वगळता नंतर काहीही निधी प्राप्त झाला नाही़ त्यामुळे विकासाला गती मिळू शकली नाही.देशभरात हजारो कोटी रुपयांची रस्ते विकासाची कामे होत असल्याने माहूर येथील लोकप्रतिनिधी, संस्थानचे विश्वस्त व पत्रकारांनी रखडलेल्या माहूर तीर्थक्षेत्र विकासांसंदर्भात नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन माहूर विकासासाठी साकडे घातले़ त्यांनी रोप वेसाठी ३९.१६ कोटी, लिफ्टसाठी १५.६८ कोटी व विश्रामगृहासाठी २० कोटी असा ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता़ याच दरम्यान २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक विभागाकडून झाल्याने सर्व कामाना गतिरोधक लागले़ त्यामुळे माहूर गडावर येणाऱ्या भाविकांसह शहरवासियांना विकासासाठी अजून काही दिवस तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडReligious Placesधार्मिक स्थळेfundsनिधी