नांदेड : मशिनरी व इतर साहित्यावरील भरण्यात आलेला व्हॅट व्याजासह परत मिळविण्यासाठी कारखानदाराकडून दहा लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वस्तू व सेवाकर उपायुक्त बाळासाहेब तुकाराम देशमुख यांना लाचलुचपत पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले.कारखाना उभारणीवेळी खरेदी करण्यात आलेल्या मशिनरी व इतर साहित्यावरील भरण्यात आलेला व्हॅट व्याजासह परत मिळविण्यासाठी परभणीतील वस्तू व सेवाकर कार्यालयातून फाईल मागवून ती पुढे सहआयुक्त यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त नागपूर यांच्याकडे अंतिम मंजुरीला पाठविण्यासाठी देशमुख यांनी तक्रारदाराला दहा लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली होती.त्यानुसार शहरातील एका हॉटेलात सापळा रचण्यात आला होता. यावेळी तक्रारदाराकडून दहा लाखांची लाच घेताना देशमुख यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उश्रिापर्यंत सुरू होती.
उपायुक्तांना दहा लाखांची लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 04:50 IST