शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१ तारखेला निवृत्तीवेतन खात्यात जमा; पेन्शन वाटपात नांदेड जिल्हा राज्यात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 11:16 IST

जिल्ह्यात असलेल्या विविध विभागांच्या पेन्शनधारकांचे निवृत्तीवेतन वेळेत वाटप करण्यात नांदेड जिल्हा राज्यात अग्रस्थानी आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात विविध विभागांचे २१ हजार ५०० पेन्शनधारक आहेत. मागील तीन वर्षांपासून दरमहा एक तारखेला निवृत्तीवेतन पेन्शनधारकांच्या खात्यामध्ये आॅनलाईन जमा केले जाते.

नांदेड : जिल्ह्यात असलेल्या विविध विभागांच्या पेन्शनधारकांचे निवृत्तीवेतन वेळेत वाटप करण्यात नांदेड जिल्हा राज्यात अग्रस्थानी आहे. मागील तीन वर्षांपासून दरमहा एक तारखेला निवृत्तीवेतन जिल्ह्यातील पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होते.

जिल्ह्यात विविध विभागांचे २१ हजार ५०० पेन्शनधारक आहेत. या पेन्शनधारकांना नियमित निवृत्तीवेतन देण्यासाठी कोषागार अधिकारी कार्यालय तत्पर असते. मागील तीन वर्षांपासून दरमहा एक तारखेला निवृत्तीवेतन पेन्शनधारकांच्या खात्यामध्ये आॅनलाईन जमा केले जाते. यामुळे जिल्ह्यात पेन्शनधारकांची कोणतीही अडचण उद्भवली नाही. कोषागार विभागाकडून निवृत्तीवेतन वेळेत मिळण्यासाठी एखादे देयक थांबवले जाते मात्र पेन्शनधारकांचे निवृत्तीवेतन अदा करण्यास प्राधान्य दिले जाते.यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी नीळकंठ पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कोषागार विभागातील अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील राहतात. 

पेन्शनधारकांनी १५ डिसेंबरपर्यंत स्वाक्ष-या कराव्यातपेन्शनधारकांना १ नोव्हेंबर १५ डिसेंबर या कालावधीत ज्या बँकेतून आपण पेन्शन घेतो तेथील रजिस्टरवर आपली स्वाक्षरी करावयाची आहे. पेन्शनधारकांची स्वाक्षरी ही हयात पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. बँकांमध्ये पेन्शनधारकांना स्वाक्षरीसाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवले आहे. १५ डिसेंबरनंतर जे पेन्शनधारक बँकांतील रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करु शकले नाही त्यांच्यासाठी ही सुविधा कोषागार कार्यालयात ३० डिसेंबरपर्यंत उपलब्ध राहणार आहे. ज्या पेन्शनधारकांच्या प्रकृतीचा विषय आहे त्यांच्यासाठी वैद्यकीय अधिकाºयांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल, असेही कोषागार विभागाने कळवले आहे. बँकांनीही पेन्शनर्सच्या स्वाक्षरीसाठी सहकार्याची भूमिका ठेवावी व पेन्शनपासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Nandedनांदेड