शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

उपोषणकर्त्याचा दसरा तंबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:59 IST

तालुक्यातील धारजणी येथे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक पिकांचे नुकसान करुन मारहाण केल्याचा आरोप करीत संबंधित वन कर्मचा-यांना निलंबन करावे व झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीकरिता एका शेतक-याने उपविभागीय कार्यालयासमोर १७ आॅक्टोबरपासून आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.

ठळक मुद्देभोकर उपविभागीय कार्यालयासमोर पिकांच्या नुकसान भरपाईसाठी तीन दिवसांपासून उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कभोकर: तालुक्यातील धारजणी येथे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक पिकांचे नुकसान करुन मारहाण केल्याचा आरोप करीत संबंधित वन कर्मचा-यांना निलंबन करावे व झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीकरिता एका शेतक-याने उपविभागीय कार्यालयासमोर १७ आॅक्टोबरपासून आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.उपोषणाला ३ दिवस झाले तरी वन विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी उपोषणस्थळी भेट दिली नसल्यामुळे उपोषणकर्त्याला दसरा सण तंबूतच साजरा करावा लागला.उपोषणास बसलेले शेतकरी रामदास गणपती लिंगमपल्ले (रा. धारजणी) यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, माझ्या मालकीच्या शेतजमिनीत उभे पीक असताना वन विभागाच्या कर्मचा-यांनी जबरदस्ती जेसीबीने खोदकाम करून नाली खोदकाम केले. तसेच वन कर्मचाºयांनी २ आॅक्टोबर रोजी माझ्या मुलासोबत को-या कागदावर सही कर म्हणून वाद घातला. नाली खोदकामामुळे शेतातील कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले.त्यानंतर सदर शेताची भूमापन मोजणी कार्यालयामार्फत मोजणी केली असता सदर शेतजमीन शेतकरी रामदास लिंगमपल्ले यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. करण्यात आलेले नाली खोदकाम बुजविण्यासाठी २५ हजार खर्च आला. अशाप्रकारे उभ्या पिकांचे नुकसान व झालेला खर्च मिळून एकूण ५ लाख २९ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला. याबाबत येथील वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे यांच्याशी संपर्क केला असता तो होवू शकला नाही.

  • नाली खोदकाम बुजविण्यासाठी २५ हजार खर्च आला. अशाप्रकारे उभ्या पिकांचे नुकसान व झालेला खर्च मिळून एकूण ५ लाख २९ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला. याबाबत येथील वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
टॅग्स :Nandedनांदेडagitationआंदोलन