शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दापशेडमध्ये शेततळे हरवल्याची तक्रार !; कारवाईसाठी ग्रामस्थांचे उपोषण सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 18:48 IST

लोहा तालुक्यातील दापशेड येथे शेततळे हरवल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावरील योग्य कारवाईसाठी ग्रामस्थांनी उपोषणासही प्रारंभ केला आहे.

नांदेड : लोहा तालुक्यातील दापशेड येथे शेततळे हरवल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावरील योग्य कारवाईसाठी ग्रामस्थांनी उपोषणासही प्रारंभ केला आहे.

दापशेड येथे जलयुक्त शिवार अभियानातंर्गत मातीबांध, नालासरळीकरण, शेततळे, विहीर पुनर्भरण आदी कामे केल्याचे कागदोपत्री दाखवून कोट्यवधी रुपये हडप करण्यात आल्याची तक्रार गावक-यांनी केली आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षात कोणतेही काम नसल्याची तक्रार जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे. 

विहीर पुनर्भरण कामात लोहा तालुक्यामध्ये जवळपास ६ लाखांचा तर डहाळीच्या कामातही पाच लाखांचा अपहार झाल्याची बाब पुढे आले होती. मात्र या सर्व प्रकरणाची चौकशी अद्याप गूलदस्त्यातच आहे. या प्रकरणात जिल्हाधिका-यांनी कारवाई करावी,अशी मागणी भाजपाच्या दक्षिण विभागाचे युवा मोर्चा अध्यक्ष राम मोरे, अविनाश शीतळे, शिवराज टोणगे, गंगाराम शीतळे, श्यामराव शीतळे, मरीबा सोनकांबळे आदींनी केली आहे. याच मागणीसाठी गुरुवारपासून राम मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणास प्रारंभ केला आहे. दरम्यान, जिल्हाभरात जलयुक्त शिवारची कामे सुरु असली तरी या कामाच्या दर्जाबाबत मात्र आता साशंकता घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात झालेली कामे राजकीय हस्तक्षेपाविना पार पडली. पुढे मात्र मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने कामामध्ये अनागोंदी सुरु आहे. परिणामी जलयुक्तच्या तक्रारीमध्येही मोठी वाढ झाली आहे.

‘एमबी’ तयार करुन उचलले बिल...दापशेड येथील जलयुक्तच्या कामामध्ये तीन शेततळे झाल्याचे दाखविण्यात आले आहे. भागिरथाबाई गोविंद शीतळे, वसंतराव विठ्ठल शीतळे आणि लक्ष्मीबाई अशोक टोणगे यांच्या नावे शेततळे कागदोपत्री दाखवली खरी  मात्र प्रत्यक्षात लक्ष्मीबाई टोणगे यांच्या शेततळे गट क्र. २९५ मध्ये आजघडीला कोणतेही शेततळे झाले नाही. मग कृषी विभागाने लाखो रुपये खर्चून केलेले शेततळे चोरीला गेले काय? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे या शेततळ्याची एमबी तयार करुन बिलही काढण्यात आले आहे.