शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

हदगाववासियांची उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:57 IST

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २६ मार्च शेवटची तारीख असतानाही काँग्रेसकडून कोण रिंगणात उतरणार, याची उत्सुकता कायम आहे.

हदगाव : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २६ मार्च शेवटची तारीख असतानाही काँग्रेसकडून कोण रिंगणात उतरणार, याची उत्सुकता कायम आहे. दरम्यान, सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या परिने गुप्त भेटीगाठी घेत प्रचाराला सुरुवात केली आहे.हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघ येतो़ माहूर-किनवट, कळमनुरी-हिंगोली, महागाव-उमरखेड, वसमत विधानसभा मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे़ आतापर्यंत मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षाकडे होता़ याच मतदारसंघातून सन २००४-०९ या पाच वर्षामध्ये सूर्यकांता पाटील निवडून ग्रामविकास मंत्री झाल्या होत्या़ परंतु, त्यानंतर शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांनी त्यांचा पराभव करून सन २००९ ला खासदारकी मिळविली़ सन २०१४ मध्ये अ‍ॅड़ राजीव सातव यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काँग्रेस पक्षाकडे घेतला व सुभाष वानखेडे यांचा मोदी लाटेतही पराभव केला़सन १९९९-२००४ यावर्षी अ‍ॅड़ शिवाजीराव माने हे शिवसेनेकडून विजयी झाले होते़ त्यांनी राष्ट्रवादीच्या सूर्यकांता पाटील यांचा पराभव केला होता़ सन १९९४ ते १९९९ या वर्षातही सूर्यकांता पाटील खासदार होत्या़ या मतदारसंघाचा विचार करता एक टर्मच प्रत्येक पक्षाला विजय मिळाला आहे़

  • यावर्षी भाजपा व सेना वेगवेगळे निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा होती. त्यामुळेच अ‍ॅड़ शिवाजीराव माने, सूर्यकांता पाटील, सुभाष वानखेडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला व उमेदवारीसाठी प्रयत्न केला़ परंतु, दोन्ही पक्षाची युती झाली व ही जागा शिवसेनेची असल्यामुळे या नेत्यांची गोची झाली़ सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी वर्षापासून फिल्डींग लावली़ अनेकदा त्यांच्या प्रवेशाच्या तारखाही जाहीर झाल्या़ पत्रकार परिषदा घेवून त्यांनी प्रवेश करणार असल्याचे जाहीरही केले़ परंतु स्थानिक शिवसैनिकांनी त्यांना विरोध केल्यामुळे त्यांचा प्रवेश थांबला़ मध्येमध्ये ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या सोशल मीडियावर उठल्या़ अ‍ॅड़ शिवाजीराव जाधव यांना शिवसेनेत प्रवेश देवून उमेदवारी देणार असल्याची चर्चा आता थांबली़

 

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक