शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चार न्यायाधीशांसह कुटुंबातील सात सदस्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 06:00 IST

हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेस शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तीन कार्यरत न्यायाधीश, एक निवड झालेले न्यायाधीश, दोन वकील आणि दोन महिला अशा ७ जणांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नांदेड : हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेस शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तीन कार्यरत न्यायाधीश, एक निवड झालेले न्यायाधीश, दोन वकील आणि दोन महिला अशा ७ जणांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार महिलेचे वडील मुंबईत न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुलअफशार सुलताना बेगम शेख वसीम (२५, रा. रा. पांडरकोडा कालापूर, जि. यवतमाळ मु. हाजीअली शासकीय वसाहत, मुंबई) यांचा विवाह शेख वसीम अक्रम शेख महमद जलाल (रा. पांडरकोडा कालापूर, जि. यवतमाळ) यांच्याशी ११ डिसेंबर २०१६ रोजी झाला. गुलअफशार यांचे मूळ घर नांदेड शहरातील इतवारा भागात आहे. लग्नानंतर काही दिवस संसार ठीक चालला. मात्र त्यानंतर शेख वसीम आणि गुलअफशार यांच्यात बेबनाव झाला. पती-पत्नीचे भांडण मिटविण्याचा प्रयत्न झाला. परंतु यश आले नाही.अखेर २१ जून रोजी गुलअफशार यांनी सात जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. यावरून इतवारा पोलिसांनी ३ न्यायाधीश, १ न्यायाधीश निवड झालेली व्यक्ती, १ वकील, २ महिला अशा ७ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाची कलमे ३९५, ४९८, (अ), १२० (ब), ३५४, ५०४, ५०६, ३९५, ३५४ आणि कलम ४ हुंडाबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतवाराचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर सांळुके यांना देण्यात आला आहे.काय आहे तक्रारविवाहापूर्वी व विवाहानंतर आरोपींनी वडिलांकडे वारंवार ११ लाख ५० हजारांची मागणी केली. यासाठी शिवीगाळ करुन धमकीही दिली. याबरोबरच चाकूचा धाक दाखवून पर्समधून २५ तोळ्याचे सोन्याचे दागिने हिसकावून घेतले.गुन्हा कोणावर दाखलन्या. शेख वासीम अक्रम (रा. पांडरकोडा कालापूर, जि. यवतमाळ), त्यांचे भाऊ न्या. शेख अमिर शेख जलाल (रा. हातसांगवी, जि. जालना) त्यांचे न्यायाधीश असलेले भाऊजी शेख जावेद सिद्दीकी (रा. माहूर, जि. नांदेड), न्यायाधीश परीक्षा पास झालेले शेख जुनेद शेख जलाल (रा. देगलूरनाका, नांदेड), वकील असलेले शेख वासीम यांचे वडील मोहम्मद जलाल शेख कासीम पटेल, आई अफसरी बेगम शेख जलाल (रा. देगलूर नाका, नांदेड) आणि वासीम अक्रम यांची बहिण शेख करानाज शेख जावेद सिद्दीकी (रा. माहूर, जि. नांदेड) या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा