शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
3
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
4
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
5
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
6
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
7
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
8
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
9
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
10
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
11
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
12
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

कोविड योद्धांची आर्थिक रसदच तोडली; निवासी डॉक्टर दोन महिन्यांपासून विद्यावेतना विना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 6:57 PM

जून आणि जुलै या दोन महिन्यांचे विद्या वेतन थकविण्यात आले आहे़

ठळक मुद्देशासनाकडून केवळ आश्वासनेच

नांदेड- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आरोग्य सेवेची प्रत्यक्ष जबाबदारी असलेल्या निवासी डॉक्टरांचा शासनाने कोविड योद्धा म्हणून गौरव केला आहे़ परंतु या कोविड योद्धांची आर्थिक रसदच गेल्या दोन महिन्यांपासून तोडण्यात आली आहे़ विद्यावेतन मिळत नसल्याने निवासी डॉक्टर आता मेटाकुटीला आले आहेत़ नांदेड, लातूर, औरंगाबाद आणि मिरज या चार महाविद्यालय व रुग्णालयात असाच प्रकार आहे़

कोरोनाच्या संकटामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टांवरील कामाचा ताण वाढला आहे़ या डॉक्टरांवरच रुग्णालयातील आरोग्य सेवा अवलंबून आहे़ या निवासी डॉक्टरांना महिन्याकाठी साधारणत: ५३ हजारांचे विद्या वेतन मिळते़ परंतु जून आणि जुलै या दोन महिन्यांचे विद्या वेतन थकविण्यात आले आहे़ राज्य शासनाने निवासी डॉक्टरांना कोरोनाच्या काळात विद्यावेतनात दहा हजारांची वाढ करण्याची घोषणा केली होती़ परंतु त्यातील छदामही या निवासी डॉक्टरांच्या हाती अद्याप पडलेला नाही़ नांदेड येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आजघडीला १५५ निवासी डॉक्टर आहेत़ तर औरंगाबादला ४९०, लातूरला १७४ आणि मिरजला १७४ निवासी डॉक्टर विद्या वेतनाच्या प्रतिक्षेत आहेत़ विद्या वेतन मिळत नसल्यामुळे या कोविड योद्धांची मोठी पंचाईत झाली आहे़

शासनाकडून केवळ आश्वासनेचकोविड योद्धा म्हणून एकीकडे आमचा गौरव करायचा अन् दुसरीकडे आर्थिक नाकेबंदी करायची़ असे शासनाचे धोरण आहे़ कोविडवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असताना प्रत्यक्ष सेवा बजाविणाऱ्या निवासी डॉक्टरांनाच विद्या वेतनापासून वंचित ठेवण्यात आले आहे़ याबाबत शासन दप्तरी अनेकवेळा मुद्दा मांडला़ परंतु केवळ आश्वासनेच मिळत आहेत़ त्यामुळे पुढील काळात मार्ड संघटनेच्या वतीने वेगळे पाऊल उचलण्याची तयारी करण्यात येत आहे़- डॉ़प्रणव जाधव, अध्यक्ष मार्ड संघटना नांदेड़

प्रस्ताव पाठविला आहेनिवासी डॉक्टरांच्या वेतनाच्या संदर्भाने संचालक कार्यालय आणि शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़ त्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे़ येत्या काही दिवसात निवासी डॉक्टरांना त्यांचे विद्या वेतन मिळणार आहे़ - डॉ़सुधीर देशमुख, अधिष्ठाता़ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेडScholarshipशिष्यवृत्तीdoctorडॉक्टर