शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

अर्धापूर शिवारातील शेत जमिनीची ५ पासून मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:19 IST

तालुक्यातून जाणा-या नियोजित नांदेड-यवतमाळ-वर्धा रेल्वे मार्गासाठी लागणा-या भूसंपादनाच्या प्रस्तावासाठी एकमेव शिल्लक राहिलेल्या अर्धापूर शिवारातील शेतजमिनीच्या मोजणीला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे़ मराठवाडा-विदर्भाचा समन्वय साधणा-या नांदेड-यवतमाळ-वर्धा रेल्वे मार्गासाठी लोकमतच्या एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी या रेल्वे मार्गाच्या मंजुरीपासून ते या प्रकल्पाला विशेष दर्जा मिळवून देण्यापर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे़

ठळक मुद्देनांदेड-यवतमाळ-वर्धा नियोजित रेल्वेमार्ग, भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग

उदयकुमार गुंजकर।लोकमत न्यूज नेटवर्कअर्धापूर : तालुक्यातून जाणा-या नियोजित नांदेड-यवतमाळ-वर्धा रेल्वे मार्गासाठी लागणा-या भूसंपादनाच्या प्रस्तावासाठी एकमेव शिल्लक राहिलेल्या अर्धापूर शिवारातील शेतजमिनीच्या मोजणीला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे़मराठवाडा-विदर्भाचा समन्वय साधणा-या नांदेड-यवतमाळ-वर्धा रेल्वे मार्गासाठी लोकमतच्या एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी या रेल्वे मार्गाच्या मंजुरीपासून ते या प्रकल्पाला विशेष दर्जा मिळवून देण्यापर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे़अर्धापूर तालुक्यातून जाणा-या या नियोजित रेल्वे मार्गासाठी लागणा-या पार्डी, चिंचबन, कारवाडी, रहीमपूर, कलदगाव, दाभड, येळेगाव शिवारातील शेतजमिनीची मोजणी झाली़ देगाव शिवारातील दोन ते चार गटांची व अर्धापूर शिवारातील शेतजमिनीची मोजणी शिल्लक राहिली असून अर्धापूर शिवारातील २४१, २४३, २४४, २४५, २४६, २४७, २४८, २४९, २३४, २३५, २३३, २२८, २२९, २१५, २१४, २१६, २१३, २१८, २१९, २२०, २२१, २२७, २२३, २०५, २०४, २०३, ११९, १९७, १९६, १९५, १९४, १९२, ३८२, ३८०, ३७९, ३९७, ३९८, ३८९, ३६५, ३६४, ३६२, ४००, ४३०, ४४७, ४४६, ४३३, ४४५ या गटनंबरमधील शेतजमिनीची मोजणी ५ फेब्रुवारीपासून होणार आहे़ या नियोजित नांदेड-यवतमाळ-वर्धा रेल्वे मार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या शेत जमिनीचा मुल्यांकनाच्या चौपट रक्कम शेतमालकांना मिळाल्याने समाधानाचे वातावरण आहे़कारवाडी शिव ते पांगरी रस्ता दरम्यान नियोजित रेल्वे मार्गावर अर्धापूरसाठी रेल्वे स्टेशन प्रस्तावित आहे़ पण या स्टेशनचे अंतर अर्धापूरपासून पाच ते सहा कि़मी़ असल्याने प्रवाशांच्या गैरसोयीचे ठरणार आहे़ तामसा रोड नजीक अर्धापूरसाठी रेल्वे स्टेशन व्हावे, अशी जनतेची मागणी आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.रेल्वेमार्गासाठी विजयबाबूंचा पाठपुरावाकाँग्रेसचे माजी खा. विजयबाबू दर्डा यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला फेब्रुवारी २००८ मध्ये मंजुरी मिळाली़ त्यानंतर ११ फेब्रुवारी २००९ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव यांच्या हस्ते या प्र्रकल्पाचे भूमिपूजन झाले़ त्यानंतर या प्रकल्पाला निधी मिळावा म्हणून विजयबाबूंनी सातत्याने पाठपुरावा केला़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकल्पातील अडथळे दूर करण्याची मागणी केली़ २४ सप्टेंबर २०१५ रोजी केंद्र शासनाने अधिसूचना जारी करून या प्रकल्पाला विशेष प्रकल्प म्हणून घोषित केले़ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी विजयबाबू पाठपुरावा करीत आहेत़या नियोजित रेल्वे मार्गासाठी लागणाºया पार्डी, कारवाडी व चिंचबन शिवारातील संपादित शेतजमिनीचा सुमारे ३२ कोटी रुपये मोबदल्याचे वाटप झाले असून अमरापूर, हमरापूर, लतीफपूर शिवारातील शेतजमिनीच्या मोबदल्यासाठी सर्व कागदपत्रांची संबंधितांकडून पूर्तता करवून घेतली असून लवकरच वाटप होईल -प्रदीप कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी, नांदेड़

नियोजित रेल्वे मार्गासाठी तालुक्यातील संबंधित गावच्या शेतजमिनीची मोजणी झाली आहे़ अर्धापूर शिवारातील शेतजमिनीबाबत सीमांकन चुकल्यामुळे रेल्वे बोर्डाकडून दुरुस्त प्रस्ताव प्राप्त झाला आहे़ त्यासाठी अर्धापूर शिवारातील शेतजमिनी मोजून अंदाजे ३७ हेक्टर जमीन संपादन करण्याचा प्रस्ताव आहे़ ५ फेब्रुवारीपासून होणाºया मोजणीसाठी संबंधित गट मालक शेतक-यांनी आपआपली वहीवाट दाखवून मोजणीस सहकार्य करावे - एम़ए़एच़ आगाई, उपअधीक्षक भूमी अभिलेख, अर्धापूऱ

संपादित शेतजमिनीच्या मोबदल्याबाबत शेतकरी समाधानी आहेत़ पण काही शेतक-यांच्या शेतजमिनीचे या रेल्वे मार्गामुळे दोन भाग झाल्याने शेती व्यवस्थापन गैरसोयीचे ठरणार आहे - पांडुरंग देशमुख, शेतकरी़