शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : नांदेडमध्ये आणखी सहा बाधित; रुग्णसंख्या ११६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 22:17 IST

पॉझिटिव्ह आढळलेल्या एकाचा झाला मृत्यू

ठळक मुद्देकोरोनाचा नांदेडच्या नवीन भागात शिरकावआतापर्यंत सहा बाधितांचा मृत्यू

नांदेड : नांदेडकरांसाठी गुरुवारचा दिवसही चिंता वाढविणारा ठरला. रात्री नऊच्या सुमारास प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाचे आणखी सहा रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ११६ वर गेली आहे. दुसरीकडे गुरुवारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्याही सहावर गेली आहे.

गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास स्वॅब अहवाल प्राप्त झाले. यातील सहा जण बाधित असल्याचे आढळून आले. धक्कादायक म्हणजे दोन रुग्ण गाडीपुरा भागातील असल्याने या भागात कोरोनाने पहिल्यांदाच शिरकाव केल्याचे दिसून आले. या दोन्ही रुग्णांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एकाचा गुरुवारीच उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्याही आता सहा इतकी झाली आहे. नांदेड शहरातील यात्री निवास परिसरातील एकजण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. तर दोघेजण मुखेड तालुक्यातील रावणकुळा येथील आहेत. तर एक बाधित रुग्ण हा बिलोली तालुक्यातील केरुर येथील असल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले. मुखेड तालुक्यातील दोन्ही रुग्णावर मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत तर बिलोली तालुक्यातील केरुर येथील रुग्णावर बिलोली येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.  नव्याने सहा बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाने या बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 

दरम्यान, ११६ रुग्णांपैकी ६ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर ४१ रुग्ण हे बरे झाल्यामुळे उपचारानंतर त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे. दरम्यान, गुरुवारपर्यंत जिल्ह्यात १ लाख २६ हजार ७१६ व्यक्तींनी जिल्ह्याबाहेरुन प्रवेश केल्याचे प्रत्यक्ष सर्व्हेक्षणातून पुढे आले. या सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात आली असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. तर बाधित आढळून आलेल्या ११६ रुग्णांपैकी सहा जणांचा आजवर मृत्यू झाला असून ४१ रुग्ण हे उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.उर्वरीत ६८ रुग्णांपैकी नऊ रुग्णांवर डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय पंजाबभवन कोवीड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत. तर ५२ रुग्णांवर यात्रीनिवास कोवीड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील बाधित आढळून आलेल्या रुग्णावर संबंधित तालुका ठिकाणच्या कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याने प्रशासनाने कळविले आहे.

बिलोली, मुखेड तालुक्यातही कोरोनाचा शिरकावच्मागील काही दिवसात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने प्रादूर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे. बुधवारी नायगावसह भोकर तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर गुरुवारी बिलोलीसह मुखेड तालुक्यातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही रुग्णावर संबंधित तालुक्याच्या ठिकाणी उपचार सुरू करण्यात आले असून प्रशासनाने संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.स्नेहनगरमध्ये खबरदारीबुधवारी जिल्ह्यात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले होते. यातील एक बाधित स्नेहनगर पोलीस कॉलनी येथील असल्याचे पुढे आल्यानंतर गुरुवारी प्रशासनाने या भागात खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड