शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

CoronaVirus : नांदेडमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील ५० जणांना केले क्वारन्टाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 18:23 IST

एका ६५ वर्षीय नागरिकास कोरोना झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने पिरबुºहाननगरसह ५ कि.मी.चा परिसर पुर्णपणे सील करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपरिसरातील दोन रुग्णालयेही केली सील७० हजार नागरिकांचा होणार सर्व्ह

नांदेड : आजवर कोरोनामुक्त असलेल्या नांदेडमध्ये पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी जिल्ह्यातील ९ संशयीतांचे स्वॅब नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील एका ६५ वर्षीय नागरिकास कोरोना झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने पिरबुºहाननगरसह ५ कि.मी.चा परिसर पुर्णपणे सील करण्यात आला आहे.

मंगळवारी दुपार पर्यंत नांदेड जिल्ह्यातून ४४९ नमुण्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील ३७८ नमुणे निगेटीव्ह आढळूण आले होते. त्यानंतर मंगळवारी रात्रीच उर्वरीत ६६ नमुण्यांपैकी ५७ नमुण्यांचा अहवालही प्राप्त झाला होता. हे सर्व नमुणेही निगेटीव्ह आढळल्याने नांदेडकरांना दिलासा मिळाला होता. उर्वरित ९ नमुण्यांच्या तपासणी अहवालाची प्रशासनाला प्रतिक्षा होती. या नमुण्यांचा अहवाल आज बुधवारी सकाळी प्राप्त झाला. त्यातील एक नागरिक कोरोना बाधित असल्याचे आढळूण आले. ताप, खोकला व दम लागत असल्याने सदर नागरिक २० एप्रिल रोजी शासकिय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्याचा स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. सदर बाधित रुग्णावर उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले असून या सील केलेल्या भागात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संभावीत संशयीतांच्या तपासणीसाठी वैद्यकिय पथके आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच शहरातील वर्कशॉप कॉर्नर ते आनंदनगर व राजकॉर्नर ते शिव मंदिर या मार्गावरून पिरबुºहाननगरकडे जाणारे सर्व रस्ते सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात १४४ कलम लागू असल्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहनही पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

५० जणांना केले क्वारंटाईनबुºहाननगर येथील या व्यक्तीने मागील काही दिवसात कुठे कुठे प्रवास केला याचा शोध घेतला जात आहे. सध्यातरी तो काही  दिवसापूर्वी केवळ उमरीला जावून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ५० जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून पिरबुºहाननगर भागातील दोन खाजगी रुग्णालयेही सील करण्यात आली आहेत. शासकिय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल होण्यापूर्वी सदर रुग्णाने या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. या दोन पैकी एका रुग्णालयात तो एक दिवस अ‍ॅडमिटही होता अशी माहितीही प्रशासनाने दिली आहे.

७० हजार नागरिकांचा होणार सर्वेपिरबुºहाननगर भागात कोरोनाचा रुग्ण आढळूण आल्यानंतर जिल्ह्यातील प्रशाकिय यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असून वैद्यकिय महाविद्यालयातील डॉक्टर या रुग्णावर लक्ष ठेवून आहेत. महानगरपालिकेने पिरबुºहाननगरात तातडीने २०० कर्मचाºयांसह कंटेनमेन्ट सर्वेला सुरुवात केली असून या परिसरातील सुमारे ७० हजार नागरिकांची घरोघरी जावून आरोग्य विषयक माहिती घेण्यात येणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.