शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : लॉकडाऊन काळात नांदेड पोलिसांनी वाहनधारकांकडून ७० लाखांचा दंड केला वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 17:56 IST

शहरातील विविध भागात दीडशे दुचाकी गाड्या केल्या जप्त

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाकडून शहरात कडक कारवाई जप्त गाड्या आता 15 एप्रिलला मिळणार

नांदेड : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन करण्यात येत आहे़ परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत अनेकजण फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडत आहेत़ अशा दुचाकीस्वारांवर पोलिसांकडून काही दिवस दंडात्मक कारवाई करण्यात आली़ परंतु शुक्रवारपासून पोलिसांनी कठोर कारवाईला सुरुवात केली असून थेट दुचाकीच जप्त करण्यात येत आहे़ पहिल्याच दिवशी दीडशे दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे़ अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत़ भाजीपाला, किराणा साहित्य, औषधी घरपोच मिळण्यासाठी नागरीकांना हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आल्या आहेत़ परंतु, त्यानंतरही नागरिक घराबाहेर पडत आहेत़ त्यामुळे यंत्रणेवरील ताण वाढत आहे़ पोलिसांकडून सुरुवातीला अशा नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़ दररोज साधारणत: दीड ते दोन हजार जणांकडून दंड वसूल करण्यात आला़ परंतु, दंडात्मक कारवाईलाही नागरिक जुमानेसे झाले़ त्यामुळे पोलिसांनी आता कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे़ शुक्रवारपासून शहरात दुचाकी जप्तीला सुरुवात करण्यात आली आहे़

पहिल्याच दिवशी शहरातील विविध भागांतून जवळपास दीडशे दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़ तर आतापर्यंत ७० लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोनि़चंद्रशेखर कदम यांनी दिली़ दरम्यान, शुक्रवारी विनाकारण घराबाहेर पडलेल्या अनेकांना पोलिसांनी रस्त्यावर बसविले़ तसेच त्यांच्या दुचाकी जप्त केल्या़ पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे शुक्रवारी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडलेल्यांची संख्या बरीच कमी झाली होती़ त्यामुळे रस्त्यावरही शुकशुकाट होता़

१५ एप्रिललाच मिळणार दुचाकीच्नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे़ परंतु याकडे अनेक जण दुर्लक्ष करीत असून रस्त्यावर गर्दी करीत आहेत़ प्रत्येक वाहनधारकांची कसून तपासणी करण्यात येत आहे़ परंतु यावेळी काही जण वादही घालत आहेत़ त्यामुळे आता दुचाकी जप्तीस सुरुवात करण्यात आली आहे़ जप्त केलेल्या या दुचाकी आता वाहनधारकाला १५ एप्रिलला मिळणार आहेत, अशी माहिती पोनि़चंद्रशेखर कदम यांनी दिली़ 

टॅग्स :Nandedनांदेडcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTrafficवाहतूक कोंडी