शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

coronavirus : नांदेड @१२५ ; दिवभरात नऊ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 22:17 IST

कुंभारटेकडीत ५, करबलानगर २ आणि मुखेड येथे सापडले २ रुग्ण

नांदेड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या  वाढतच आहे़ शनिवारी सकाळी ९७ अहवालांपैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते़ तर सायंकाळी त्यामध्ये आणखी सहा जणांची भर पडली असून दिवसभरात नऊ रुग्ण आढळून आले आहेत़  यातील पाच रुग्ण कुंभार टेकडीचे, तर मुखेड येथे २ आणि करबलानगर येथेही २ रुग्ण आढळले. त्यामुळे  रुग्णसंख्या आता १२५ झाली आहे़ 

जिल्हा प्रशासनाने शनिवारपासून सर्व बाजारपेठ खुली करण्याचे आदेश दिले आहेत़ परंतु, त्यासाठी अटी आणि शर्थींचे पालन करण्याची गरज आहे़ तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्णही वाढत आहेत़ परंतु, हे रुग्ण कंटेमनेंट झोनमधील आहेत़ शनिवारी ९७ जणांचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला होता़ त्यातील ८८ जण निगेटिव्ह निघाले़ तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले़ त्यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे़ या रुग्णांना यात्री निवास व एनआरआय भवन येथे ठेवण्यात आले आहे़ हे तिघेही जण कुंभारटेकडी परिसरातील आहेत़ 

 यापूर्वीही कुंभार टेकडीमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत़ तर सायंकाळी सहा वाजता १३५ अहवालांपैकी १२० जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत़ तर ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत़ सहा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये करबला नगर येथील एक पुरुष अन् एक महिला असे दोन, कुंभार टेकडी येथील एक पुरुष अन् एक महिला तर मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील एक पुरुष आणि एक महिला असे रुग्ण आढळून आले आहेत़ आतापर्यंत जिल्ह्यात  १२५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत़ त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे़ तर ५२ रुग्णांना  उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 

आतापर्यंत प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे १ लाख ३१ हजार ४०७ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे़ तर ३ हजार ८२ जणांचे नमुने घेण्यात आले होते़ त्यापैकी २ हजार ७४० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ ११९ स्वॅब अनिर्णीत झाले़ १४ जणांचे स्वॅब नाकारण्यात आले होते़ आतापर्यंत सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ सध्या रुग्णालयात ६२ जणांवर उपचार सुरु आहेत़ नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

कुंभारटेकडीची चिंता वाढलीशहरातील कुंभारटेकडी भागात गेल्या काही दिवसांपासून दररोज रुग्ण आढळून येत आहेत़ शनिवारी एकाच दिवशी या भागातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले़ अगोदर आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात हे रुग्ण आले होते़ आता या रुग्णांच्या संपर्कात आणखी कोण-कोण आले, याचा शोध घेण्यात येत आहे़ त्याचबरोबर करबलानगर येथेही यापूर्वी रुग्ण आढळले होते़ शनिवारी त्या ठिकाणच्या रुग्णात आणखी दोघांची भर पडली आहे़ तर दुसरीकडे सांगवी भागातील पॉझिटिव्ह रुग्णाचा सोर्स शोधण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे़ कंटेनमेंट झोनची संख्याही आता वाढत चालली आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड