शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : एक विवाह असाही ! आई - वडिलांच्या साक्षीने सहजीवनाची घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 19:37 IST

लघूळ येथे कृतीतून कोरोना रोखण्याचा संदेश

ठळक मुद्देप्रशासनाला सहकार्य करून गर्दी टाळलीफुले दामत्यांच्या प्रतिमेस वंदन करुन जोडले नाते  

सगरोळी (जि़.नांदेड ) सध्या कोरोनाची धास्ती संपूर्ण जगानेच घेतली आहे. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुुरु आहेत़ सर्व व्यवहार तसेच सार्वजनिक कार्यक्रमही ठप्प झालेले आहेत़ यातून विवाह सोहळे सुध्दा सुटलेले नाहीत़ मात्र बिलोली तालुक्यातील सगरोळी सर्कलमधिल मौजे लघूळ येथे एक विवाह सोहळा संपन्न झाला़ विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य करीत आपल्या राहत्या घरीच केवळ आई वडिल आणि जवळच्या चार नातेवाईकांच्या साक्षीनेच हा विवाह पार पडला.   बिलोली तालुक्यातील सगरोळी सर्कलमधिल मौजे लघूळ येथिल पद्मीनबाई विजय कुडकेकर यांची कन्या पुजा ही सध्या परिचारिका म्हणून काम करीत आहे. गावातीलच रहिवाशी असलेले लक्ष्मीबाई यादव मिरजे यांचे चिरंजीव सुरेश  हे  सध्या पुणे येथे एका अशासकिय कंपनीत कामाला आहेत़ त्यांचा विवाह २९ मार्च रोजी  ठरला होता. सत्यशोधक पध्दतीच्या रिवाजाप्रमाणे दोन्ही  कुटुंबांनी लग्नाची तयारीही सुरू केली होती. संपूर्ण नातेवाईकांना निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आल्या़ दरम्यान, कोरोनाचे संकट वाढले, हा प्रार्दुभाव  आटोक्यात आणण्यासाठी शासकिय पातळीवर उपाययोजना सुरु झाल्या़ त्यातूनच संचारबंदी लागू झाली़ त्यामुळे आपोआपच विवाह सोहळेही थांबले़ मात्र कुडकेकर आणि मिरजे कुटूंबियांनी शासनाच्या नियम व जमावबंदीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेत विवाह सोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला़ आणि त्यानूसार आई-वडीलांसह जवळच्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा उरकला़फुले दामत्यांच्या प्रतिमेस वंदन करुन जोडले नाते      १८९७ च्या प्लेग या जीवघेण्या साथीच्या आजारात रूग्ण सेवा करतांना प्राण गमावलेल्या शिक्षणज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासह सत्यशोधक  महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस वंदन करून महापुरुषांच्या प्रतिमेच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. या माध्यमातून वेळ व पैशाचा अपव्ययही टाळण्याचा संदेशही या कुटुंबाने प्रत्यक्ष कृतीद्वारे दिला आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड