शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : अहवाल निगेटीव्ह तरीही मृत्यूने गाठलेच; नांदेडमधील ६४ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 16:40 IST

कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही गुरुवारी दुपारी दीड वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्च चिकित्सक डॉ़ निळकंठ भोसीकर यांनी सांगण्यात आले.

ठळक मुद्दे या ६४ वर्षीय रुग्णाच्या माध्यमातून कोरोनाने नांदेडमध्ये शिरकाव केला होता.

नांदेड : जवळपास महिनाभर कोरोनामुक्त असलेल्या नांदेड शहरात  पिरबुऱ्हाणनगर येथील ६४ वर्षीय नागरिक कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. या बाधित नागरिकाला इतरही विविध आजार होते. या इतर गंभीर आजाराने या रुग्णाचा पिच्छा सोडला नाही. कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही गुरुवारी दुपारी दीड वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्च चिकित्सक डॉ़ निळकंठ भोसीकर यांनी सांगण्यात आले.

या ६४ वर्षीय रुग्णाच्या माध्यमातून कोरोनाने नांदेडमध्ये शिरकाव केला होता. त्यानंतर  पिरबुºहाणनगर परिसर प्रशासनाने पुर्णत: सील करीत तीन कि.मी. परिसर कंटेनमेन्ट झोन म्हणून घोषित केला होता. २०० आरोग्य कर्मचाºया मार्फत  ३ कि.मी. परिसरातील ५० ते ६० हजार नागरिकांच्या आरोग्याची तपासणीही सुरु करण्यात आली.  कोणताही प्रवास न केलेल्या या ६४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग नेमका कोणापासून झाला याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे होते. कोरोना बाधित व्यक्तीचे कुटुंबीय सदर व्यक्ती गेल्या दोन महिन्यापासून घरामध्येच असल्याचे सांगत होते. या बाधितास मधुमेह, अस्थमा आदी आजार होते. या आजाराचे उपचार  केले जात होते. मागील आठ दिवसात त्यांनी शहरातील पिरबुºहाणनगर येथे आणि सहयोग नगर येथील एका रुग्णालयात उपचारही घेतले होते.  त्यानंतर प्रकृती बिघडल्याने ते पुन्हा खाजगी रुग्णालयात गेले होते. मात्र, त्यांना सदर खाजगी रुग्णालयाने शासकिय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार २० एप्रिल रोजी ते नांदेड येथील शासकिय रुग्णालयात दाखल झाले. येथे त्यांचा तातडीने स्वॅब घेण्यात आला. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर  सदर व्यक्ती   कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले होते.  त्यानंतर सदर पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरातील जवळपास १४ व्यक्तींना प्रशासनाच्या वतीने क्वारंटाईन करण्यात आले होते.  त्यानंतर या सर्वांचे स्वॅब तपासणी अहवालही निगेटीव्ह आले. पाठोपाठ या रुग्णाचाही पहिला अहवाल निगेटीव्ह आल्याने नांदेडकरांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र इतर आजाराशी झुंज देत असतानाच गुरुवारी दुपारी या ६४ वर्षीय व्यक्तीचे उपचारादरम्यान निधन झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड