शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : मुखेडला कोरोनाने पुन्हा घेरले;२४ तासात ९ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 10:19 IST

नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत आहे.

ठळक मुद्देनांदेड शहराला दिलासा मिळाला असून ११८ पैकी तब्बल १११ अहवाल निगेटिव्ह आले.जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २६६ झाली आहे.

नांदेड : मुखेड तालुक्यात २४ तासात तब्बल नऊ कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी पहाटे पाच आणि मध्यरात्री आलेल्या अहवालामध्ये चार रुग्ण बाधित आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांवर मुखेड येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, चार दिवसांपूर्वी कोरेानामुक्त झालेल्या मुखेड तालुक्याला पुन्हा कोरोना विषाणूने गाठले आहे.

नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत आहे. सोमवारी जिल्ह्यातील ११८ रुग्णांच्या नमून्यांचा अहवालसमोर आला. त्यापैकी चार अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर १११ अहवाल निगेटीव्ह आले आणि ३ अहवाल नाकारण्यात आले. कोरोना बाधित रुग्णांमध्ये मुखेड तालुक्यातील पाखंडी येथील ५० वर्षीय महिलेचा ही समावेश असून तर तिघे विठ्ठल मंदिर परिसरातील आहेत. हे सर्व रुग्ण यापूर्वीच्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २६६ झाली आहे. मुखेडमधील बाधित रुग्णांमध्ये एका डॉक्टरांसह व्यापाऱ्याचाही समावेश आहे.

नांदेड शहराला दिलासा

दरम्यान, शनिवारी नांदेड शहरात २२ बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी तब्बल २० जण हे एकाच बँकेचे कर्मचारी होते. तसेच सर्व जण शहराच्या विविध भागातील रहिवासी  असल्याने नांदेडकरांची चिंता वाढली होती. मात्र रविवारी शहरातील बरकतपुरा भागात केवळ एक रुग्ण बाधित आढळला तर सोमवारी रात्रीच्या अहवालात ११८ पैकी तब्बल १११ अहवाल निगेटिव्ह आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड