शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : नांदेडमध्ये कोरोना चारशेच्या उंबरठ्यावर; आज आणखी पाच बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 11:14 IST

मागील आठ दिवसात कोरोनाचे तब्बल ८२ रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्देगुरुवारी सकाळी स्वॅब तपासणी नमुन्यांचे २८ अहवाल प्राप्त झाले.

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. मंगळवारी १४ तर बुधवारी १७ रुग्ण आढळून आल्यानंतर आज गुरुवारी सकाळीच आणखी पाच रुग्णांची यात भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३९७ वर जावून पोंहचली आहे.

गुरुवारी सकाळी स्वॅब तपासणी नमुन्यांचे २८ अहवाल प्राप्त झाले. यातील १४ अहवाल निगेटिव्ह आले तर पाच अहवाल पॉझिटिव्ह आढळले. या नव्या पाच  रुग्णांमध्ये चार जण नांदेड शहरातील तर एक जण मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील आहे. नांदेड शहरात निजाम कॉलनी परिसरात साठ वर्षीय महिला बाधित आढळली आहे. याबरोबरच खुदबईनगर येथील एका चाळीस वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर जुन्या मोंढ्यातील एक छतीस वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेटमोगरा येथील ३० वर्षीय पुरुषालाही कोरोनाची बाधा झाली असून या चौघांचे अहवाल प्राप्त होताच यंत्रणेने त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू केला आहे.

आठ दिवसात ८२ रुग्णमागील आठ दिवसात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढल्याने नांदेडकरांच्या चिंतेत भर पडली आहे. मागील आठ दिवसात कोरोनाचे तब्बल ८२ रुग्ण आढळून आले आहेत. २५ जून रोजी पाच रुग्ण आढळले होते. त्यानंतर २६ आणि २७ जून या दोन दिवसात प्रत्येकी १७ रुग्णंची भर पडली. २८ जून रोजी पुन्हा दोन रुग्ण आढळले तर २९ जून रोजी ६ रुग्णांची भर पडली. ३० जून रोजी १४ बाधित आढळून आले. तर काल बुधवारी १७ रुग्ण आढळल्यानंतर आज गुरुवारी सकाळीच यामध्ये आणखी पाच नव्या रुग्णांची भर पडली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड