नांदेड - सारखणी इथल्या लेंगी महोत्सवाच्या आयोजकांवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या लेंगी महोत्सवाला सैराट फेम आर्चीला बोलावल्याने 16 फेब्रुवारीला मोठी गर्दी झाली होती. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी मास्कचा वापर केला न्हवता, तसेच सोशल डिस्टन्सचे पालन केले न्हवते. याबाबत किनवट तालुका महसूल विभागाच्या वतीने सिंदखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. त्या नुसार एकूण सहा आयोजकांवर सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोरोना प्रतिबंधक नियम आणि भांदवीच्या कलम 188, 269, 270 आणि 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे सारखणी इथले या कार्यक्रमाचे संयोजक असलेले सहा जण अडचणीत आलेयत.
coronavirus: आर्चीला बोलावण्याची हौस पडली महागात, कोरोना प्रतिबंधात्मक नियमानुसार दाखल झाला गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 16:32 IST