शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बॅरिकेटिंग,परप्रांतांच्या सीमा तातडीने सील; नांदेड जिल्ह्यात आळंदी पॅटर्नने लोंढे रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 20:23 IST

तीन राज्याच्या सीमासह विदर्भाची सीमा नांदेडला लागून

ठळक मुद्देलढाई अजून संपली नाही

नांदेड :  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे़ नांदेड जिल्ह्याच्या सर्व सीमाही सील करण्यात आल्या आहेत़ आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा यासह शेजारील विदर्भाच्या सीमा नांदेड जिल्ह्याला लागून आहेत़ त्यामुळे या ठिकाणाहून येणारे नागरिकांचे लोंढे रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते़ पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी त्यासाठी आळंदी पॅटर्न राबविला़ त्यानंतर हा पॅटर्न राज्यातील अनेक जिल्ह्यांत राबविण्यात आला़ त्यामुळे नांदेडात येणाऱ्या लोंढ्यांना रोखण्यास यश मिळाले.

देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना नांदेडात मात्र आतापर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही़ नांदेड जिल्ह्याला लागूनच तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक यासह विदर्भाच्या सीमा आहेत़ या ठिकाणी नांदेडकरांचा रोटी-बेटीचा व्यवहार चालतो़ त्यामुळे नांदेडात येणाºयांची संख्या मोठी आहे़ लॉकडाऊन झाल्यानंतर या भागातून येणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली़ या लोंढ्यामुळे नांदेडकरांना मात्र धोका होवू शकतो हे वेळीच ओळखून तातडीने सर्व सीमा सील करण्यात आल्या़ त्यासाठी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांचा आळंदी येथील अनुभव कामी आला़ आळंदी पॅटर्ननुसार त्यांनी चाळीस ठिकाणी बॅरिकेटींग लावली़ त्यात प्रामुख्याने सापशिडी बॅरिकेट, फिक्स पॉर्इंट, आंतरराज्य चेकपोस्ट, ड्रोन कॅमे-यांद्वारे लक्ष यांचा समावेश होता़ जनतेला होणारी गैरसोय, राजकीय मंडळींनी केलेली टिप्पणी या सर्व अडचणींवर यशस्वीपणे तोडगा काढून लॉकडाऊनची अमंलबजावणी करण्यात येत आहे़ हे करीत असताना अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही़ याचीही खबरदारी घेण्यात आली़ नांदेड जिल्ह्यात केलेल्या या प्रयोगाचे अनेक जिल्ह्यांनी अनुकरण केले़  

लढाई अजून संपली नाही़़़लॉकडाऊनच्या काळात नांदेडकरांनी खूप सहकार्य केले आहे़ अत्यावश्यक सेवेशिवाय नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत़ जे विनाकारण बाहेर पडत आहेत़ त्यांच्याविरोधात कारवाई सुरु आहे़ नांदेडात आतापर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही़ ही समाधानाची बाब आहे़ परंतु लढाई अजून संपली नाही़ त्यामुळे गाफील न राहता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे़ पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी त्यासाठी आळंदी पॅटर्न राबविला़ त्यानंतर हा पॅटर्न राज्यातील अनेक जिल्ह्यांत राबविण्यात आला़ त्यामुळे नांदेडात येणाऱ्या लोंढ्यांना रोखण्यास यश मिळाले़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड