शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

coronavirus : नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ८१ बाधीत आढळले; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 19:58 IST

जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या १४९ वर गेली आहे़

ठळक मुद्देजिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४ हजार १८७ एवढी झाली आहे़

नांदेड : सोमवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या ४३६ अहवालापैकी ३४४ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले तर आणखी ८१ जण बाधीत असल्याचे आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४ हजार १८७ एवढी झाली आहे़ दरम्यान, मागील २४ तासात आणखी दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने एकूण कोरोना बळींची संख्या १४९ वर गेली आहे़

सोमवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्रात १३ रुग्ण आढळून आले़ लोहा तालुक्यात १०, हदगाव ६, नायगाव ७, मुखेड २ तर किनवट, यवतमाळ, लातूर, हिंगोली आणि कंधार तालुक्यातील प्रत्येकी एक जण नांदेडमध्ये बाधीत आढळला आहे़ तर अ‍ॅन्टीजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात १२, मुदखेड तालुक्यात ७, बिलोली ५, नांदेड ग्रामीण आणि नायगाव तालुक्यात प्रत्येकी ४, कंधार आणि धर्माबाद तालुक्यात प्रत्येकी २ तर भोकर आणि अर्धापूर तालुक्यात प्रत्येकी १ जण बाधीत असल्याचे उघड झाले़ दरम्यान, सरपंचनगर येथील एका ७० वर्षीय महिलेवर शहराती खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते़ उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने या महिलेचा १६ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला़ तर विष्णुपूरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असलेला उमरी तालुक्यातील गोरठा येथील ५५ वर्षीय महिलेचाही उपचारा दरम्यान सोमवारी मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या १४९ झाला़ आहे़ आजवर जिल्ह्यात ४ हजार १८७ बाधीत आढळून आले असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये १ हजार ५३४ जणांवर उपचार सुरु आहेत़ यातील १८४ बाधीतांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ भोसीकर यांनी सांगितले़

आजवर २४७७ जणांनी केली कोरोनावर मात : सोमवारपर्यंत ४ हजार १८७ कोरोना बाधीत आढळून आले असले तरी आजवर २ हजार ४७७ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे़ सोमवारी जिल्ह्यातील ६३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे़ यामध्ये मुखेड येथील ११, पंजाब भवन नांदेड ८, नायगाव, बिलोली प्रत्येकी ७, हदगाव ६, किनवट, उमरी प्रत्येकी ५, विष्णुपूरी नांदेड आणि कंधार प्रत्येकी ४, जिल्हा रुग्णालय ३, तर खाजगी रुग्णालयातील एकाचा यात समावेश आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड