शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

CoronaVirus : नांदेड जिल्ह्यात ७,८४१ जणांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 17:45 IST

१४ दिवस घरात थांबणे बंधनकारक

ठळक मुद्देनांदेड शहरात ४०२५बाहेर दिसल्यास कारवाई

नांदेड : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी विविध पातळीवर उपाययोजना सुरु आहेत़ याचाच भाग संशयितांना होम क्वारंटाईन केले जात आहे़ शुक्रवारी नांदेड शहरात आणखी १० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून, आता शहरात होम क्वारंटाईन केलेल्यांची संख्या ४ हजार २५ एवढी झाली आहे़  तर जिल्ह्यात ७ हजार ८४१ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ या सर्वांना १४ दिवस घरात थांबणे बंधनकारक आहे़ 

नांदेडच्या शेजारी असलेल्या हिंगोली जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्ण निघाल्याने नांदेडमधील यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे़ घराबाहेर विनाकारण पडणा-यांना दंड ठोठावला जात आहे़ याबरोबरच शहराच्या विविध भागात बॅरीकेटस् लावून अकारण घराबाहेर पडणा-यांना चाप लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे़  दुसरीकडे, बाहेर जिल्ह्यातून आलेल्या तसेच कोरोनाची प्राथमिक लक्षणे असलेल्या सर्दी, तापाच्या रुग्णांनाही होम क्वारंटाईन करण्यात येत आहे़ नांदेड जिल्ह्यात अशा ७ हजार ८४१ जणांच्या हातावर शिक्के मारुन घरामध्येच राहण्यास सांगण्यात आले आहे़

ग्रामीण भागाचा विचार करता शुक्रवारी आणखी ६२ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले़ यामध्ये मुखेड येथे सर्वाधिक १३, भोकर १२, हदगाव ७, कंधार ९, देगलूर, धर्माबाद प्रत्येकी ३, लोहा, उमरी प्रत्येकी ६ तर कुंडलवाडी येथे २ आणि अर्धापूर येथे १ जणाच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला़ 

जिल्ह्यातील नगरपालिकानिहाय आकडेवारीचा विचार केला असता, सर्वाधिक ६३९ जण कंधार येथे होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत़ तर कुंडलवाडी १७२, किनवट १७५, देगलूर २३२, धर्माबाद १४२, बिलोली ८६, लोहा २८९, उमरी १४२, हदगाव २४८, भोकर ४७९, मुखेड २७२, मुदखेड १५७, अर्धापूर ३१०, माहूर ९६, हिमायतनगर १६५ तर नायगाव नगरपालिके     अंतर्गत २१० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ नांदेड महानगरपालिकेअंतर्गत कालपर्यंत ४ हजार १५ जण होम क्वारंटाईन होते़ यामध्ये आणखी १० जणांची भर पडली असून आता ही संख्या ४ हजार २५ एवढी झाली आहे़ या सर्वांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत़

 

बाहेरगावाहून येणा-यांचा ओघ सुरुचच्कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने घराघरांत जावून सर्वेक्षण करण्यात येत आहे़ शुक्रवारी जिल्ह्यात बाहेरगावाहून आलेल्यांची संख्या पुन्हा १६०५ ने वाढल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले असून, आता जिल्ह्यात ४९ हजार १२६ नागरिक हे बाहेर गावाहून जिल्ह्यात परतल्याचे स्पष्ट झाले आहे़ यामध्ये अर्धापूर २,१६८, भोकर १,९६०, बिलोली ४००५, देगलूर ६,२६५, धर्माबाद १३६१, हदगाव ३८५२, हिमायतनगर १७२२, कंधार ८८४३, किनवट २२९९, लोहा ४५५८, माहूर ३१२८, मुदखेड १५०३, मुखेड ८२५२, नायगाव ५६९४, नांदेड २२३०, उमरी १७१८ आणि इतर ठिकाणी ३९६६ जण बाहेर गावाहून परतलेले आहेत़ 

१५ जण डॉक्टरांच्या निगराणीखालीच्बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांचा घरोघरी जावून सर्व्हे करण्यात येत आहे़ यात पुण्या, मुंबईहून आलेल्यांच्या हातावर शिक्के मारुन त्यांचे घरामध्येच विलगीकरण करण्यास सांगण्यात आले आहे़ याबरोबरच कोरोनाची तापासह इतर लक्षणे असणा-यांनाही दक्षता घेण्याच्या हेतूने क्वारंटाईन करण्यात येत आहे़ तर कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने संशयितांना रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे़ जिल्ह्यात अशा १५ आयसोलेशन केसेस आहेत़ यामध्ये देगलूर येथे ३, मुखेड ४, माहूर ६ आणि नायगाव येथे दोघांना आयसोलेट करण्यात आले आहे़ नांदेडसह मुखेड येथे खास कोरोनासाठी रुग्णालय असणार आहे़ येथेही पुरेशा सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड