शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : नांदेडमध्ये रविवारी ५ नवे रुग्ण; एका महिलेचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 18:51 IST

रविवारी सकाळी एक महिला पॉझिटिव्ह आल्यानंतर लागलीच तिचा मृत्यू झाला

ठळक मुद्देएकूण १ हजार १९९ पैकी ३१ रुग्णांचा अहवाल पॉजिटीव्ह

नांदेड - नांदेडमध्ये रविवारी ५ नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली. यामध्ये पंजाब येथे जाऊन आलेल्या दोन चालकांचा, गुरुद्वारातील २ सेवादारांचा आणि जुन्या नांदेडातील रहमतनगर येथील एका महिलेचा समावेश आहे. विशेष म्हणजे सकाळीच अहवाल आलेल्या  रहमतनगर येथील महिलेचा दुपारी मृत्यूही झाला.       नांदेडमध्ये शनिवारी श्री लंगर साहिब गुरुद्वारातील २० सेवादारांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला होता. त्यानंतर रविवारी सकाळी ३ अहवाल पॉजिटीव्ह आले. यात पंजाबला भाविकांना सोडण्यासाठी गेलेल्या २ खाजगी चालकांना आणि जुन्या नांदेडातील एका महिलेचा समावेश होता. ते २ वाहनचालक शासकीय रुग्णालयात आहेत.      शहरातील एक खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रहमतनगर येथील ४८ वर्षीय महिलेला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात नेत असताना रविवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. रहमतनगर येथे कंटेनमेंट झोनची प्रक्रिया सुरू होती.  या महिलेला सारी आजाराची लागण झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यात  कोरोनाची टेस्ट केली असता ती पण पॉजिटीव्ह आली. 

नांदेडमध्ये आतापर्यंत कोरोनाचे तीन बळी गेले आहेत. कोरोना टेस्टचा दुसरा अहवाल रविवारी दुपारी आला. यामध्ये श्री लंगर साहिब गुरुद्वारामध्ये काम करणारे आणखी २ सेवादार पॉजिटीव्ह आढळले आहेत. जिल्ह्यातील तपासणी केलेल्या एकूण १ हजार १९९ पैकी ३१ रुग्णांचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. १ हजार १२२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १८ अहवालामध्ये निष्कर्ष निघाला नाही. ५ स्वबच्या तपासणीची गरज नसल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड