शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

coronavirus : नांदेड जिल्ह्यात आणखी ११८ रुग्णांची वाढ; ५ बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 19:52 IST

सोमवारी प्रशासनाला ५४५ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी ३५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले़ तर ११८ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले

ठळक मुद्देबळींचा आकडा आता १८८ वर पोहचला आहे़रुग्णांची संख्या ५ हजार १५० पोहचली आहे़

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे़ त्यात मृत्यूंची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहेत़ सोमवारी उपचार घेणाऱ्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे बळींचा आकडा आता १८८ वर पोहचला आहे़ तर नव्याने ११८ बाधित रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ५ हजार १५० पोहचली आहे़ त्यामुळे नांदेडकरांच्या चिंतेत भर पडली आहे़

सोमवारी प्रशासनाला ५४५ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी ३५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले़ तर ११८ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यात आरटीपीसीआरद्वारे केलेल्या तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र १८, नायगांव २, देगलूर ४, कंधार २, धर्माबाद १, परभणी २, लोहा ५, हदगांव ६, किनवट १, मुखेड २४ आणि हिंगोली येथील दोन रुग्णांचा समावेश आहे़ तर अँटीजेन तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र १३, अर्धापूर १३, लोहा १, किनवट ५, मुदखेड ८, धर्माबाद २, नांदेड ग्रामीण १, देगलूर १, हदगांव २, मुखेड १ आणि बिलोली येथील चार जण बाधित आढळून आले़शहरातील शक्तीनगर येथील २५ वर्षीय महिला, सहयोगनगर ६५ वर्षीय पुुरुष, प्रगती नगर ६८ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर ७८ वर्षीय पुरुष आणि नायगांव तालुक्यातील आंतरगावच्या ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे़

सध्या १ हजार ५९८ जणांवर उपचार सुरु आहेत़ त्यात विष्णूपुरी येथील रुग्णालय १७४, पंजाब भवन ६६७, जिल्हा रुग्णालय ५३, नायगांव ३७, बिलोली ३९, मुखेड १२६, देगलूर ३६, लोहा ४५, हदगांव ३९, भोकर १२, कंधार २२, किनवट २४, अर्धापूर २४, मुदखेड २७, माहूर ९, आयुर्वेदीक रुग्णालय २०, धर्माबाद ७२, उमरी ३६, हिमायतनगर २, बारड १, खाजगी रुग्णालय १२८, औरंगाबाद ४ आणि निजामाबाद येथे एका रुग्णाला संदर्भित करण्यात आले आहे़

आतापर्यंत ३ हजार ३२८ कोरोनामुक्तजिल्ह्यात सोमवारी ११३ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे़ त्यात जिल्हा रुग्णालय २, हदगांव ४, लोहा ५, मुदखेड ७, पंजाब भवन ७१, देगलूर १९, खाजगी रुग्णालय ४ आणि गोकुंदा येथील कोविड सेंटर येथील एका रुग्णाचा समावेश आहे़ आतापर्यंत ३ हजार ३२८ जणांनी कोरोनावर मात केली आहे़ १४३ जणांची प्रकृती गंभीर असून २६८ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत़ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड