शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७५ केंद्रांवर आज कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST

जिल्ह्यात १८ जुलै रोजी मनपा हद्दीतील स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमानगर, ...

जिल्ह्यात १८ जुलै रोजी मनपा हद्दीतील स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या १४ केंद्रांवर कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध असणार आहेत.

तर श्री गुरू गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या १४ केंद्रांवर कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी १०० डोस तर शहरी दवाखाना सिडको येथे ५० डोस उपलब्ध आहेत. तसेच श्री गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, शहरी दवाखाना कौठा एकूण दोन केंद्रांवर कोविशिल्डचे ५० डोस उपलब्ध असणार आहेत.

स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध असणार आहेत. तर श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय येथे कोव्हॅक्सिनचे ५० डोस उपलब्ध असणार आहेत.

शहरी भागात मोडणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय देगलूर, ग्रामीण रुग्णालय हदगाव, गोंकुदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी एकूण १३ केंद्रांवर कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी १०० डोस तर ग्रामीण रुग्णालय, बारड येथे प्रत्येकी ५० डोस उपलब्ध करून दिले आहेत.

उपजिल्हा रुग्णालय हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, मांडवी, कंधार, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी या १२ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी १०० डोस तर ग्रामीण रुग्णालय लोहा या केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी ५० डोस उपलब्ध आहेत.

जिल्ह्यात ग्रामीण भागातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रांत कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत. तर ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांत कोविशिल्डचे प्रत्येकी ५० डोस उपलब्ध असणार आहेत.

उपरोक्त लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटासह ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाइन किंवा लसीकरण केंद्रांवर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

जिल्ह्यात १६ जुलैपर्यंत एकूण ७ लाख १४ हजार ८०४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर १७ जुलैपर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या साठ्यामध्ये कोविशिल्डचे ५ लाख ९८ हजार ३० डोस, कोव्हॅक्सिनचे १ लाख ७९ हजार ३६० डोस याप्रमाणे एकूण ७ लाख ७७ हजार ३९० डोस प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली.