शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

नांदेडमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळ्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 13:20 IST

कोरोनाबद्दल माहिती मिळाल्याने तो स्वत: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल झाला.

ठळक मुद्देचीनमध्ये कामानिमित्त जाऊन परतल्यानंतर केली तपासणीनांदेडमध्ये आल्यास स्वत:हून शासकीय रुग्णालयात दाखल

नांदेड : चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या ‘कोरोना’ या व्हायरसचा एक संशयित रुग्ण नांदेड शहरात आढळला असून, आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या संशयित रुग्णावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.हा संशयित काही कामानिमित्त चीनमध्ये गेला होता. त्यानंतर तो भारतात परतला. आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची तपासणी करण्यात आली तेव्हा तो ‘कोरोना’ निगेटिव्ह निघाला; पण  नांदेड शहरात आला तेव्हा त्याला सर्दी, खोकला आणि घशाचा त्रास जाणवू लागला. कोरोनाबद्दल माहिती मिळाल्याने तो स्वत: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल झाला.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कोरोनासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. केवळ चीनमधून परत आला आणि आजारी पडला म्हणून या व्यक्तीला कोरोना वॉर्डात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी तपासणी करून त्याचे रक्त आणि थुंकीचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी पाठविले आहेत. तीन दिवसांत हा अहवाल येईल, असे रूग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोनाNandedनांदेडhospitalहॉस्पिटल