चौकट---------------
नांदेड शहरातील ११ जणांचा मृतांमध्ये समावेश
नांदेड शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. मंगळवारी आरोग्य विभागाने कळविलेल्या आकडेवारीनुसार, २७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये ११जण नांदेड शहरातील आहेत. मंगळवारच्या अहवालावरूनही कोरोनाचा सर्वाधिक फटका वृद्धांना बसत असल्याचे दिसून येते. येथे २७ पैकी तीन जण ५० वर्षांखालील आहेत. उर्वरित २४ जण ५० पेक्षा अधिक वयाचे होते.
चौकट---------------
बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ७६.२६ टक्के
मंगळवारी जिल्ह्याच्या विविध भागांतील १,३८७ कोरोनाबाधितांनी या आजारावर यशस्वीपणे मात केली. त्यामुळे या सर्वांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील ५, गृहविलगीकरण मनपा अंतर्गतचे ९१८, कंधार १०, किनवट २८, हिमायतनगर ४६, माहूर ५, देगलूर २, जिल्हा रुग्णालय ३६, मुखेड ६०, नायगाव ८, बारड ६, अर्धापूर २०, मांडवी ३, बिलोली १२, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय १८, हदगाव ९, धर्माबाद ७, उमरी ४९, लोहा ४० तर खासगी रुग्णालयातील १०५ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ७६.२६ टक्के आहे.