शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
2
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
3
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
4
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
5
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
6
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
7
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
8
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
9
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
10
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
11
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
12
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
13
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
14
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
15
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
16
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
17
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
18
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
19
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
20
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला

नांदेड जिल्ह्यात कोरोना बळींची संख्य ५०० च्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 18:36 IST

आतापर्यंत १६ हजार ९०६ जणांची कोरोनावर मात

ठळक मुद्देशुकवारी आणखी तिघांचा मृत्यू १०४३ जणांवर उपचार सुरु

नांदेड : १६०० पेक्षा अधिक चाचण्या करुनही अवघे ८९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने घटत आहे़ ही बाब दिलासादायक असली तरी मागील चोवीस तासात आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या ५०० च्या उंबरठ्यावर पोहोंचली असून शुक्रवारपर्यंत ४९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़

आॅगस्ट महिन्यात कोरोना बाधितांची संख्या दररोज ३०० पेक्षा अधिक निघत होती़ मात्र आॅक्टोबर महिन्यात नव्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाल्याचे दिसून येत आह़े़  शुक्रवारी तर १६२५ पैकी केवळ ८९ अहवाल पॉझिटिव्ह आले असून तब्बल १५११ अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे़ त्याचवेळी औषधोउपचारानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे़ मागील २४ तासात १७० जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली़ त्यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १६ हजार ९०६ एवढी झाली आहे़ शुक्रवारी कोरोनावर मात केलेल्यामध्ये विष्णुपूरी महाविद्यालयातील ७ जिल्हा रुग्णालयातील ११, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम आयोसेलेशनमधील ९० रुग्णांसह किनवट ४, धर्माबाद ५, मुखेड, माहूर कंधार प्रत्येकी १, बिलोली ४़, नायगाव ५, लोहा २, हदगाव ४ आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या ३५ जणांचा समावेश आहे़

दरम्यान मागील २४ तासात आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला़ यामध्ये हडको येथील ५७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे़ त्यांच्यावर विष्णुपूरीतील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु होते़ तर याच ठिकाणी उपचार सुरु असलेल्या भोकर येथील ७० वर्षीय पुरुषाचाही उपचारास प्रतिसाद न दिल्याने मृत्यू झाला असून सिडको येथील ५० वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ४९८ एवढी झाली आहे़

१०४३ जणांवर उपचार सुरुकोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ दुसरीकडे बाधित रुग्णांची संख्या घटत असल्याने सद्य:स्थितीत जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये केवळ १०४३ जणांवर उपचार सुरु आहेत़ यामध्ये सर्वाधिक १५१ रुग्ण विष्णुपूरी रुग्णालयात दाखल आहेत़ तर एनआरआय पंजाब भवन, महसूल भवन आणि होम आयसोलेशनमध्ये असलेल्या ५१२ जणांवर उपचार सुरु असून जिल्हा रुग्णालय ४७, जिल्हा रुग्णालया नवीन इमारत ३०, हदगाव ७, नायगाव १४, बिलोली १५, मुखेड ६, मांडवी ७, देगलूर ८, लोहा ९, मुदखेड ७, माहूर २३, किनवट २६, धर्माबाद १०, उमरी ७, कंधार १०, अर्धापूर १५, भोकर ११,हिमायतनगर १ तर खाजगी रुग्णालयात १२४ जणांवर उपचार सुरु आहेत़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNandedनांदेडDeathमृत्यू