प्राणही गमवावे लागले. कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांचे कोविड नियमाप्रमाणे अंत्यविधी करण्यात
आली. ही जबाबदारी मनपाने नेटाने पार पाडली. त्यात अंत्यविधीचा खर्च मात्र नातेवाईकांना करावा लागला.
जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत १ हजार ८९० बळी गेले. दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूसंख्या वाढली
होती. तालुकास्तरावर जिल्हा प्रशासनाने कोरोना केअर सेंटर स्थापन केले होते. पण जिल्हा कोरोना रुग्णालय
व खासगी रुग्णालयातही उपचार करण्यात आले होते. नांदेडमधील खासगी रुग्णालये, जिल्हा रुग्णालये,
विष्णूपुरी येथील शासकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मरण पावलेल्या सर्व रुग्णांवर नांदेड
महापालिकेच्यावतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी हॅपी क्लब या सेवाभावी संस्थेनेही
मोठी मदत केली.
चौकट-----------
कोरोना रुग्ण मृत्युमुखी पडल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार महापालिकेने शहरातील गोवर्धनघाट, सिडको
स्मशानभूमी येथे केले. या अंत्यविधीसाठी महापालिकेने स्वतंत्र पथकांची नेमणूक केली होती. झोननिहाय
पथकांना अंत्यविधीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. जवळपास दहा कर्मचारी अंत्यविधीसाठी नियुक्त
करण्यात आले होते. सहायक आयुक्तांना अंत्यविधी पार पाडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
चौकट--------------
कोरोना रुग्णाच्या एका अंत्यविधीसाठी जवळपास पाच हजार रुपये खर्च येत होता. हा खर्च प्रशासन मयताच्या
नातेवाईकाकडूनच घेत होते. परंतु काही रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ते रक्कम
देऊ शकत नव्हते. त्यामुळे महापालिकेच्या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या हा खर्च उचलला.
चौकट-------------
कोरोना संकटात अंत्यविधी पार पाडण्याची मोठी जबाबदारी महापालिकेवर होती. ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने
मनपाने पार पाडली. मनपाची पथके वेळीच अंत्यविधी पार पाडत होते. त्यामुळे कोणताही प्रश्न निर्माण झाला
नाही. कोरोना नियमावलीप्रमाणे अंत्यविधी करण्यात आले. -जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,
चौकट-------------
महापालिकेने कोरोना संकटात अंत्यविधी पार पाडण्यासाठी नियोजन केले होते. कोरोना संकट मोठे होते.
अंत्यविधीच्या प्रक्रियेतून प्रसार होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली. अधिकाऱ्यांनाही
याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या त्यांनी योग्यरीत्या पार पाडल्या. - डॉ. सुनील लहाने, आयुक्त
चौकट-------------
कोरोना रुग्णांचे अंत्यविधी पार पाडण्याचे मोठे आव्हान होते. महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ते
पार पाडले. यातून कोणताही अनुचित प्रकार उद्भवला नाही. तसेच वेळेत ही प्रक्रिया पार पाडण्यात आले.
वेळप्रसंगी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या खिशातूनही खर्च भागवला. - शुभम क्यातमवार, उपायुक्त, मनपा नांदेड.