शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा मतांचा टक्का यंदा पहिल्यांदाच घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:20 IST

गेल्या सहा लोकसभा निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच काँग्रेसची मतांची टक्केवारी घसरली आहे़ यंदा झालेल्या वाढीव मतदानाचा लाभ भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांना मिळाला असताना वंचितने मुसंडी मारल्यामुळे त्याचा फटका थेट काँग्रेसला बसला आहे़ नवमतदारही भाजपाकडेच वळल्याचे दिसून आले़

शिवराज बिचेवार।नांदेड : गेल्या सहा लोकसभा निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच काँग्रेसची मतांची टक्केवारी घसरली आहे़ यंदा झालेल्या वाढीव मतदानाचा लाभ भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांना मिळाला असताना वंचितने मुसंडी मारल्यामुळे त्याचा फटका थेट काँग्रेसला बसला आहे़ नवमतदारही भाजपाकडेच वळल्याचे दिसून आले़दरवेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारामध्ये केवळ चार ते पाच टक्के मतांचा फरक राहत होता़ ही पाच टक्के मतेच दरवेळी निवडणुकीत काँग्रेसच्या पारड्यात विजय टाकत होता़ यापूर्वी मकबुल सलीम, डॉ़व्यंकटेश काब्दे, गुणवंत हंगरगेकर, सुरेश गायकवाड असे सक्षम उमेदवार रिंगणात असताना त्यांना मिळालेली टक्केवारी ही निर्णायक ठरली नव्हती़ परंतु यावेळी बहुजन वंचित आघाडीने १४़७२ टक्के एवढी मते घेतली़ त्याचा मोठा फटका काँग्रेसलाच बसला़ २००९ मध्ये काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर यांना ४७़८१ टक्के तर भाजपाचे डॉ़धनाजीराव देशमुख यांना ४१़११ टक्के मते मिळाली होती़ १९९९ मध्ये काँग्रेसचे खतगावकर यांना ४४़६९ तर भाजपाचे धनाजीराव देशमुख यांना ४०़२४ टक्के मते होती़ यावेळी दोघांमध्ये केवळ चार टक्के मतांचा फरक होता़ २००४ मध्ये मात्र अचानक भाजपाची टक्केवारी वाढली होती़ भाजपाचे डी़ बी़ पाटील यांना ४५़१५ तर भास्करराव खतगावकर यांना ४२़११ टक्के मते होती़ २००९ मध्ये मात्र काँग्रेस आणि भाजपात तब्बल १० टक्क्यांचा फरक होता़ भास्करराव खतगावकर यांना ४६़५२ तर संभाजी पवार यांना ३६़५० टक्के मते होती़ तर २०१४ मध्ये अशोकराव चव्हाण यांना ४८़६७ टक्के मते मिळविली होती़ त्या तुलनेत डी़बी़पाटील यांना ४०़६३ टक्के एवढी मते मिळाली होती़ या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसची टक्केवारी ४० पेक्षा कमी भरली़ अशोकराव चव्हाण यांना ३९़५५ टक्के तर भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांना ४३़६१ टक्के मते मिळाली़ भाजपाच्या टक्केवारीत फारशी वाढ झाली नसली तरी, काँग्रेसच्या टक्केवारीवर मतांच्या धु्रवीकरणाचा मोठा परिणाम झाला़ वंचित आघाडीचे यशपाल भिंगे यांनी तब्बल १४़७२ टक्के मिळविली़ यापूर्वी काँग्रेस-भाजपा व्यतिरिक्त तिसरा तगडा उमेदवार रिंगणात असताना त्यांनाही एवढी मते मिळाली नव्हती़

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnanded-pcनांदेडElectionनिवडणूक