शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात तक्रारी जास्त,कारण लोकांना कामधंदे नाहीत;तहसीलदारांचे मंत्र्यासमोर वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 16:49 IST

''मराठवाड्यात परिस्थिती थोडी बिकट आहे. इथे लोकांना कामधंदे नाहीत. त्यामुळे अभ्यास करून तक्रारी करण्याची संख्या फार वाढली आहे''.

नांदेड: मराठवाड्यातील लोकांना काम नसल्याने ते जास्त तक्रारी करतात, त्यामुळे येथे अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे प्रमाण जास्त असल्याचा अजब दावा नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे, तहसीलदार अंबेकर यांनी हा दावा थेट महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांच्यासमोर केला आहे. या वादग्रस्त वक्तव्याची जोरदार चर्चा सोशल मिडीयावर असून भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  

औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन समारंभात तहसीलदार किरण अंबेकर यांनी हे वक्तव्य केल. गेल्या अनेक वर्षांपासून अंबेकर नांदेडमध्येच कार्यरत असून तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष आहेत. तहसीलदार अंबेकर यांचे भर सभेतील हे वादग्रस्त वक्तव्य चांगलच चर्चेत आले आहे. सभेत हसत हसत ते म्हणाले, साहेबांनी मला विचारलं की मराठवाड्यात विभागीय चौकशांचे प्रमाण फार जास्त आहे. ते कशामुळे जास्त आहे. तर मी सांगितलं, मराठवाड्यात परिस्थिती थोडी बिकट आहे. इथे लोकांना कामधंदे नाहीत. त्यामुळे अभ्यास करून तक्रारी करण्याची संख्या मराठवाड्यात फार वाढली आहे. त्यामुळे या तक्रारी होत आहेत. यात कोणत्याही पद्धतीचे आरोप केले जातात, तसेच यातले काही आरोप सत्यही असतात, अशी कबुलीही अंबेकर यांनी यावेळी दिली. 

जास्त अभ्यास केल्यानंतर कुणाला दोषी पकडायचं असेल आणि जबाबदार धरायचं असेल तर विभागाच्या जीआरमध्ये तहसिलदाराचे नाव हे शंभर टक्के टाकलं जातंय. यामुळे महसूल विभागावर ताण पडतो. याबाबत यापूर्वीही मागणी केली आहे की, साहेब आपल्या परवानगीशिवाय इतर विभागांनी असे  जीआर काढू नये, असेही महसूल मंत्री थोरातांना उद्देशून ते म्हणाले. मात्र, बोलण्याच्या ओघात मराठवाड्यातील लोकांना काम नसतं, म्हणून तक्रारी करता, असे वक्तव्य अंबेकर यांनी केल्याने नवा वाद सुरु झाला आहे. सोशल मिडीयावर काहींनी याचा निषेध करत महसूल अधिकाऱ्यांवरील तक्रारी, त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे याचा पाढा वाचला आहे. 

टॅग्स :NandedनांदेडRevenue Departmentमहसूल विभागDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय