शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी बार्टीच्या शिष्यवृत्तीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 16:55 IST

आगोदरच कोरोनामुळे अनेकज आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळण्यास विलंब होत असल्याने पालक आणि विद्यार्थी हतबल झाल्यचे चित्र आहे.

ठळक मुद्देयुपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल लागून उलटला महिना

नांदेड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या युपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल लागून महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना पुणे येथील बार्टी संस्थेच्यावतीने देण्यात येणारी ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती अद्यापही मिळालेली नसल्याने ही परीक्षा देणारे विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली. याच महिन्यात १९ ऑक्टोबर रोजी परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात येवून मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी निश्चित करण्यात आली.या पात्र ठरलेल्या मुलांना परीक्षेची तयारी करणाऱ्या बार्टी संस्थेच्यावतीने निवास व उपयुक्त पुस्तकांसाठी शिष्यवृत्ती म्हणून ५० हजार रुपये देण्यात येतात. मात्र महिना भराच कालावधी उलटला तरी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. यामुळे पुणे, मुंबई, दिल्लीसह अन्य शहरात जावून मुख्य परीक्षेची तयारी करणे, टेस्ट सिरीज लावणे, लेखण सराव, शिकवणी लावणे याबरोबरच निवास व्यवस्था करण्यासाठीही विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. युपीएससी परीक्षेमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढावा यासाठी ही योजना राबविण्यात येते. मात्र घोषणा करुनही अंमलबजावणी केली जात नसल्याने मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची आर्थिक हेळसांड होत आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित देण्याची मागणही करण्यात आली आहे.

कोरोनामुळे ‘यशदा’नेही निवास व्यवस्था नाकारलीआगोदरच कोरोनामुळे अनेकज आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळण्यास विलंब होत असल्याने पालक आणि विद्यार्थी हतबल झाल्यचे चित्र आहे. दुसरीकडे मुख्य परीक्षेची पुणे यशदा येथे तयारी करणाऱ्या मुलांना कोरोनाचे कारण पुढे करुन निवास व्यवस्था नाकारण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे मुलांच्या मानसिकेतवर विपरित परिणाम होवून याचा फटका मुख्य परीक्षेच्या निकालात बसू शकतो. शासनाने या संदर्भात तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी म्हटले आहे.

टॅग्स :NandedनांदेडStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्ती