शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

दिलासादायक ! ३९ हजार गावांतील ग्रामस्थांना मिळणार मालमत्तेची कायदेशीर पत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 19:27 IST

या अभियानांतर्गत पुढील तीन वर्षात राज्यातील ३९ हजार गावांतील नागरिकांना हक्काच्या मालमत्तेची सनद मिळणार

ठळक मुद्देगावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत नांदेड तालुक्यात काम सुरुजमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापनासाठी सहा पथकेनांदेड जिल्ह्यातील ११०० गावांमध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण

- विशाल सोनटक्के

नांदेड : राज्यातील सर्व गावांच्या गावठाणामधील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला राज्यात सुरुवात झाली आहे. यामध्ये ड्रोनद्वारे गावठाणाचे भूमापन करण्यात येत आहे. 

या अभियानांतर्गत पुढील तीन वर्षात राज्यातील ३९ हजार गावांतील नागरिकांना हक्काच्या मालमत्तेची सनद मिळणार असून, एकट्या नांदेड जिल्ह्यातील १,१०० गावांत ड्रोनद्वारे ही सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्याचा ग्रामविकास, भूमिअभिलेख आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत भारतीय सर्वेक्षण विभागाकडून ड्रोनद्वारे गावातील मिळकतींचे सर्वेक्षण करून त्याद्वारे प्राप्त झालेल्या प्रतिमांचे भूसंदर्भीकरण व ॲर्थोरेक्टिफिकेशन करण्यात येणार आहे. त्यानुसार गावठाणातील मिळकतींचा डिजिटाइज्ड नकाशा तयार करण्यात येणार असून, सदर नकाशामधील मिळकतींना म्हणजेच जीआयएस डाटाला ग्रामपंचायतीच्या मिळकत रजिस्टरशी जोडण्यात येणार आहे. त्यानंतर गावाच्या गावठाण हद्दीतील मिळकतींची नियमाप्रमाणे चौकशी करून मिळकत पत्रिका व सनद भूमिअभिलेख विभागामार्फत तयार करण्यात येणार असून, त्यानंतर ग्रामविकास विभाग गावातील मिळकतींचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करणार आहे. गावठाण मोजणीचे काम पूर्ण झाल्यानंतर या मालमत्ता पत्रिकांचे विशेष मोहीम राबवून वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा, तालुका आणि गावस्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असून, जिल्हास्तरावरील जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती दर आठवड्याला या कामांचा आढावा घेणार आहे.

ग्रामपंचायतीच्या महसुलातही होणार वाढया उपक्रमामुळे गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक तयार होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील जमिनीचे वाद मिटणार आहे. याबरोबरच मालमत्तेची कायदेशीर पत्रिका मिळाल्याने कर्जासह इतर सुविधा मिळण्यासही मदत होणार आहे. दुसरीकडे ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल. मालमत्ता कराची व्याप्ती वाढल्याने ग्रामपंचायतीच्या महसुलातही वाढ होईल.

मालकी हक्क व हद्दीचे वाद कमी होणारशासनाच्या या गावठाण जमाबंदी प्रकल्पामुळे प्रशासकीय नियोजनांसाठी गावठाण भूमापन नकाशे उपलब्ध होणार आहेत. ही भूमापनाची सर्व्हे कार्यपद्धत पारदर्शकपणे राबविली जात असून, यामुळे ग्रामस्थांना त्यांचे अधिकार अभिलेख सहज सुलभपणे उपलब्ध होतील. गावठाणातील जमिनीविषयक मालकी हक्काबाबत व हद्दीबाबत निर्माण होणारे वादही कमी होण्यास मदत मिळेल.- डॉ. सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड

सहा टीम कार्यरत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील १,१०० गावांमध्ये गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सध्या नांदेड तालुक्यात या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी भूमिअभिलेखच्या २४ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या सहा टीम कार्यरत आहेत. यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या वतीने दोन ड्रोन पुरविण्यात आले असून, नांदेड तालुक्यानंतर इतर तालुक्यातही टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.- सुरेखा सेठिया, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख विभाग

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागNandedनांदेड