शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचोरी रोखण्यासाठी आता महसूल, पोलीस विभागाचे संयुक्त भरारी पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 19:32 IST

जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समिती सरसावल

ठळक मुद्दे यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावयाचा आहे. 

नांदेड : जिल्ह्यात वाळू चोरीचा ऐरणीवर आलेला प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर आणि पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी आता संयुक्त पथके स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून या पथकामार्फत अवैध रेती उत्खनन व वाहतूक होत असल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समितीची बैठक २४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ. इटणकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध वाळूचा उपसा व वाहतूक ही गंभीर बाब असल्याचे सांगत हा प्रकार आता पूर्णत: बंद होणे गरजेचे असल्याचे सांगितले. अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याबाबतही आदेशित करण्यात आले. या तक्रार निवारण केंद्रात २४ तास कर्मचारी नियुक्त करावा, असेही सुचित करण्यात आले. ज्या ग्रामपंचायतीमध्ये अवैध वाळू उपसा, वाहतूक होत असेल अशा ग्रामपंचायतीच्या ग्रामदक्षता समितीस जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. 

जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला संयुक्त बैठक घेवून त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध रेती वाहतूक व अवैध उपसा यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावयाचा आहे. दुसरीकडे महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांचे संयुक्त भरारी पथक गठीत करावे व सदरील पथकामार्फत अवैध रेती उपसा व वाहतूक तात्काळ रोखावी, असेही आदेशित केले आहे. अवैध रेती उत्खनन व वाहतुकीच्या अनुषंगाने पोलीस व महसूल विभागाने एकत्रित कारवाई करण्याचेही या बैठकीत निर्देशित करण्यात आले. अवैध रेती वाहतुकीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्यास जप्त केलेली वाहने परिवहन विभागाकडे मोटार वाहन कायद्यानुसार कारवाईसाठी द्यावीत. त्या वाहनांची कायद्यानुसार नोंदणी रद्द करावी, असेही स्पष्ट करण्यात आले. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी उपस्थित होते.

वाळू वाहतूक होणाऱ्या चौकी, नाक्यांची माहिती द्याच्उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त समिती स्थापन करुन सदरील समितीमार्फत ज्या चौक्या, नाक्यावरुन अवैध वाळू वाहतूक होत आहे अशा रस्त्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. प्रत्येक चौकीच्या ठिकाणी महसूल, पोलीस व इतर विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली जाणार आहे. या चौकीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबतही निर्देश दिले आहेत. 

टॅग्स :sandवाळूNandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड