शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

गारठा आणखी वाढणार; फेब्रुवारीत पुन्हा येणार थंडीची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 17:22 IST

१७ ते २५ डिसेंबर दरम्यान हे पश्चिमी विक्षोपीय वारे अथवा धुर्वीय वारे अधिक तीव्र होत असल्याने सकाळी व सायंकाळी बोचर्‍या थंडीला सामोरे जावे लागत आहे़  अतिथंड वार्‍यामुळे २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत कमालीची घट जाणवणार आहे़

नांदेड : उत्तरेकडून वाहणार्‍या थंड वार्‍यामुळे विदर्भासह मराठवाडाही गारठला असून नांदेडचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसवर पोहचले आहे़ या थंडीमुळे नांदेडकरांना दोन दिवसापासून हुडहुडी भरली आहे़ 

थंडीमुळे गुरूवारी शहरात मुख्य बाजारपेठेतील वर्दळ मंदावल्याचे चित्र होते. सकाळी ११ वाजेपर्यंत थंडीचा जोर कायम रहात असून, दुपारी ३ वाजल्यापासूनच थंडी वाजण्यास पुन्हा सुरूवात होत आहे़ थंडीमुळे शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले़ शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटत असल्याचे दिसत आहेत़ 

थंडीपासून रक्षणासाठी नागरिक उबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडत आहेत़  मागील दहा दिवसापासून नांदेड परिसरात १० अंशाच्या वर तापमानाची नोंद होत झाली़ मात्र आता १० अंशाहून कमी तापमानाची नोंद होण्यास सुरूवात झाल्यामुळे येत्या तीन, चार, दिवसात ७ ते८ अंश सेल्सिअस तापमान नोंदल्या जाण्याची शक्यता वर्तविली आहे़ त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

बर्फवृष्टीमुळे  आली थंडीची लाटउत्तरे त्यात पश्चिमी विक्षोपीय वारे अथवा ध्रुविय वारे जे अतिशय थंड व वेगाने वाहत आहेत़ हे वारे अफगाणिस्तान, पाकिस्तान भागातून भारताच्या वायव्य दिशेने पंजाब, हरियाणा, राजस्थान येथून दाखल होतात़ मात्र गेल्या काही वर्षापासून वरील राज्याच्या दक्षिणेस असलेल्या गुजरात व महाराष्ट्रात दाखल होत आहेत़  या वर्षाच्या शेवटी उत्तर भारतात कश्मिर, लेह, लद्दाक परिसरात वेळेअधिच बर्फवृष्टीला सुरूवात झाली आहे़ अतिशय गारठून टाकणारा चिलाईकलान हा काळ २१ डिसेंबर पासून सुरू होतो़ मात्र यावेळेस तो वेळेआधी सुरू झाल्याचे दिसून येते़

७ अंशावर पारा पोहचण्याची शक्यता१७ ते २५ डिसेंबर दरम्यान हे पश्चिमी विक्षोपीय वारे अथवा धुर्वीय वारे अधिक तीव्र होत असल्याने सकाळी व सायंकाळी बोचर्‍या थंडीला सामोरे जावे लागत आहे़  अतिथंड वार्‍यामुळे २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत कमालीची घट जाणवणार आहे़ नवीन वर्षाच्या स्वागतानंतर पुढील दोन दिवस थंडी कायम राहणार आहे़ मराठवाडा विभागातील अनेक शहरात किमान तापमान १० अंशाच्या खाली घसरणार आहे़ जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तसेच फेब्रुवारीमध्ये हेच तापमान ७ अंशावर किंवा यापेक्षा कमी जाण्याची शक्यता आहे़ - श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएमचे खगोल व अंतराळ, विज्ञान केंद्र 

टॅग्स :Nandedनांदेड