शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

किनवटचे उपनगराध्यक्ष नेम्मानीवारांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:36 IST

नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षाविरुद्ध १३ नगरसेवकांनी १५ मे रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता़ त्यावर विशेष सभा घेऊन चर्चा होण्याआधीच उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांनी शुक्रवारी आपल्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला़

ठळक मुद्देनाट्यमय घडामोडीवर पडदा उपनगराध्यक्ष पदासाठी आता फिल्डिंग

किनवट : नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षाविरुद्ध १३ नगरसेवकांनी १५ मे रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता़ त्यावर विशेष सभा घेऊन चर्चा होण्याआधीच उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांनी शुक्रवारी आपल्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला़ त्यामुळे अविश्वासाच्या नाट्यमय घडामोडींवर तूर्तास पडदा पडला आहे़ आता नवा उपाध्यक्ष कोण असणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे़भाजपची सत्ता असलेल्या किनवट नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांचा करारानुसार १६ महिन्यांचा कालावधी ३० एप्रिल रोजी संपला होता़ त्यानंतर हे पद नगरसेवक तथा सभापती अजय चाडावार यांना बहाल करण्याचे पक्षाअंतर्गतच्या विचारविनिमयात ठरले होते़ श्रीनिवास नेम्मानीवार यांचा उपनगराध्यक्षपदाचा करारानुसार कालावधी संपल्याने संभाव्य उपसभापती म्हणून ज्याचे नाव समोर आले, त्या अजय चाडावार यांची उत्कंठा शिगेला पोहोचली अन् विद्यमान उपनगराध्यक्ष नेम्मानीवार यांनी राजीनामा द्यावा, याबाबत खलबते सुरू झाली़ दरम्यानच्या काळात काही नगरसेवकांनी श्रीनिवास नेम्मानीवार यांना प्रथम १५ जुलैपर्यंत व नंतर १ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचे ठरले; पण उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले चाडावार अस्वस्थ झाले होते़ उपनगराध्यक्ष नेम्मानीवार यांनी पक्षश्रेष्ठींकडे विशेषत: भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर व अशोक सूर्यवंशी पाटील यांच्याकडे ३० मेपर्यंत मुदतवाढ मागितली होती़ परंतु, पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले़ त्याआधीच म्हणजे १५ मे रोजी अविश्वास प्रस्ताव सादर झाला अशी खंत श्रीनिवास नेम्मानीवार यांनी व्यक्त केली होती़भाजपात किनवटमध्ये उघड उघड दोन गट असून एक गट माजी मंत्री डी़बी़पाटील यांचा तर दुसरा गट भाजप नेते अशोक सूर्यवंशी पाटील यांचा आहे़ उपाध्यक्ष निवडीच्या वेळी कोणती खेळी तर होणार नाही ना? अशी शंका घेतली जात आहे़ नेम्मानीवार यांच्या राजीनाम्याबाबत नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी मुख्याधिकारी यांना कळविले़ त्यानंतर आता कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे़पक्षात धुसफूस स्वखुशीने सोडले पदजिल्हा पातळीवरचे वारंवार फोन येत असल्यामुळे व पक्षात धुसफूस नको म्हणून आपण उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे, असे नेम्मानीवार यांनी सांगितले़ पुढेही पक्षासोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले़ मी भारतीय जनता पक्षाचा जबाबदार कार्यकर्ता आहे़पक्षाने घेतलेल्या समाजातील सर्व घटकांना सत्तेत सामावून घेण्याच्या भूमिकेच्या समर्थनार्थ व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशाचे पालन करत मी पदाचा राजीनामा स्वखुशीने देत असल्याचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांना श्रीनिवास नेम्मानीवार यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे़

टॅग्स :NandedनांदेडResignationराजीनामाPoliticsराजकारण