शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जालना-नांदेड बुलेट ट्रेनसाठी ‘सीएम’चे ‘पीएम’ला पत्र; मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 13:49 IST

Jalna-Nanded bullet train: नागपूर- मुंबईप्रमाणे जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग दिला, आता याच मार्गावर बुलेट ट्रेनही द्या, अशी मागणी

नांदेड : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला जालना-नांदेडसमृद्धी महामार्गाने (Samruddhi Mahamarg) कनेक्ट करण्यात आले आहे. त्याचे भू-संपादन वेगवान पद्धतीने सुरू आहे. आता याच मार्गावर नागपूर- मुंबई बुलेट ट्रेनचा प्रयत्न हाेताे आहे. ताेच पॅटर्न बुलेट ट्रेनसाठी जालना- नांदेड मार्गावरही (Jalana-Nanded bullet train) वापरावा, अशी मागणी आहे. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना नुकतेच रीतसर पत्र लिहिले आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेक चव्हाण यांनी ‘लाेकमत’ला याबाबत माहिती दिली. चव्हाण म्हणाले, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे विकासाचे अनेक दरवाजे उघडणार आहेत. त्याच धर्तीवर आता मराठवाड्याच्या विकासासाठी जालना- नांदेड ही समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी खेचून आणली आहे. त्यासाठी भू-संपादन सुरू आहे. नागपूर- मुंबई या समृद्धी महामार्गावर बुलेट ट्रेन चालविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. त्याचा डीपीआरही लवकरच तयार केला जाणार आहे. या पॅटर्नकडे आपण राज्य शासनाचे लक्ष वेधून मराठवाड्यावरच अन्याय का, असा मुद्दा उपस्थित केला. 

नागपूर- मुंबईप्रमाणे जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग दिला, आता याच मार्गावर बुलेट ट्रेनही द्या, अशी मागणी आपण सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यासाठी सकारात्मक आहेत. एवढेच नव्हे तर, त्यांनी पंतप्रधानांना यासाठी पत्रही लिहिले आहे. या समृद्धी महामार्गावर आधीच जमिनीची साेय झालेली असल्याने बुलेट ट्रेनसाठी नव्याने भू-संपादनाची गरज भासणार नाही, याकडेही लक्ष वेधले गेले. याबाबत आपण रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशीही चर्चा केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

भू-संपादनासाठी ७०० काेटी मिळणारजालना- नांदेड या समृद्धी महामार्गाचे भू-संपादन वेगाने सुरू आहे. त्यासाठी यावर्षी किमान ५०० ते ७०० काेटी रुपये मिळतील, असा अंदाज अशाेक चव्हाण यांनी व्यक्त केला.समृद्धी, बुलेट व हायस्पीड रेल्वेने नांदेड-हैदराबाद, पुणे, मुंबई ही नवी व वेगवान कनेक्टिव्हिटी निर्माण हाेणार आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBullet Trainबुलेट ट्रेनSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNarendra Modiनरेंद्र मोदीNandedनांदेड